adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पुस्तकांची अनोखी भेट! वाढदिवसाला हारतुरे नको, सामाजिक हितासाठी पुस्तक हवे; महेंद्र तायडे गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पण संस्थेतर्फे 'शिवाजी कोण होते?' या ग्रंथाच्या ५९ प्रतींचे वाटप

  वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पुस्तकांची अनोखी भेट! वाढदिवसाला हारतुरे नको, सामाजिक हितासाठी पुस्तक हवे; महेंद्र तायडे गुलाबराव वाघ यांच्...

 वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पुस्तकांची अनोखी भेट!

वाढदिवसाला हारतुरे नको, सामाजिक हितासाठी पुस्तक हवे; महेंद्र तायडे गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पण संस्थेतर्फे 'शिवाजी कोण होते?' या ग्रंथाच्या ५९ प्रतींचे वाटप


विकास पाटील धरणगाव प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : आजकाल वाढदिवस म्हटला की हारतुरे, पुष्पगुच्छ, फटाक्यांची आतषबाजी आणि मोठा खर्च, असे चित्र सर्वत्र पहायला मिळते. पण सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळीच संकल्पना धरणगावात राबविण्यात आली. शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते तथा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पण बहुउद्देशीय संस्था, धरणगाव महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होते?' या वैचारिक ग्रंथाच्या ५९ प्रतींचे वाटप करण्यात आले. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक संकट आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च, हारतुरे, पुष्पगुच्छ, फटाके किंवा इतर भेटवस्तूंवर पैसा खर्च करण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन गुलाबराव वाघ यांनी यापूर्वीच केले होते. वाढदिवसाला भेटवस्तू आणायचीच असेल, तर ती विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडणारी वह्या, पुस्तके आणि बॉलपेन यांसारखी शैक्षणिक साहित्याची असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. या आवाहनामागे वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा विचार नव्हता, तर समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जाणीव प्रत्येकाला व्हावी, हा एक चांगला हेतू होता. कारण एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त होणारा काही तासांचा आनंद संपून जातो. परंतु विद्यार्थ्यांच्या हातात दिलेले पुस्तक त्यांना आयुष्यभर विचारांची आणि ज्ञानाची शिदोरी देऊ शकते. याच भावनेतून समर्पण बहुउद्देशीय संस्थेतर्फे गोविंद पानसरे लिखित, 'शिवाजी कोण होते?' या अनमोल ग्रंथाच्या ५९ प्रतींचे वाटप करून गुलाबराव वाघांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमातून वाचनसंस्कृती, वैचारिक जागृती आणि विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी समर्पण बहुउद्देशीय संस्थेचे राज्याध्यक्ष बापुसो. महेंद्र तायडे, जिल्हा भाजपचे नेते ॲड. संजय महाजन, राष्ट्रवादी श.प. पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरखनाथ देशमुख, शिवसेना उबाठाचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र महाजन, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार, शहरप्रमुख तथा नगरसेवक भागवत चौधरी, काँग्रेसचे नंदलाल महाजन, नगरसेवक मोनू शिरसाट, लक्ष्मण महाजन, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष माळी, विजय सोनवणे, शरद शिरसाट, अशोक झुंझारराव, संतोष सोनवणे, अजय सोनवणे, गोटू रोकडे, भैय्या धनगर, हिंमत पाटील, हेमंत माळी सर,आबासाहेब वाघ, राहुल रोकडे आदींसह समर्पण बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments