adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रहार अकॅडमीचे नायब सुभेदार विनोद सिंह परदेशी यांना सदभावना पुरस्कार प्रदान समाजात शांतता, एकोपा आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे काळाची गरज - डॉ. रफिक सय्यद

  प्रहार अकॅडमीचे नायब सुभेदार विनोद सिंह परदेशी यांना सदभावना पुरस्कार प्रदान समाजात शांतता, एकोपा आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी सर्वांनी ...

 प्रहार अकॅडमीचे नायब सुभेदार विनोद सिंह परदेशी यांना सदभावना पुरस्कार प्रदान

समाजात शांतता, एकोपा आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे काळाची गरज - डॉ. रफिक सय्यद 


अहिल्यानगर / प्रतिनिधी:

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचच्या वतीन २०२६ चा देण्यात येणारा सदभावना पुरस्कार यावेळी प्रहार अकॅडमीचे नायब सुभेदार विनोद सिंह परदेशी यांना प्रदान करण्यात आला. 

विनोद सिंह परदेशी हे कोणताही जातिभेद किंवा पक्षपात न करता अनेक विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन देशसेवेसाठी तयार करण्याचे प्रशंसनीय कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सदभावना मंचाचे राज्य सचिव डॉ. रफीक पारनेरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सब्बन, जिल्हा सचिव कॉ.फिरोज शेख, कोषाध्यक्ष राजुभाई शेख, सदस्य जैद खान, उमर शेख तसेच अकॅडमीचे शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. रफीक पारनेरकर यांनी आधुनिक विज्ञान, हजरत मोहम्मद पैगंबर, संत तुकाराम महाराज, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चांगले संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, मानवता आणि उच्च चारित्र्य यांचे महत्त्व त्यांनी सांगितले.

देशात आणि राज्यात सामाजिक सलोखा, शांतता आणि बंधुभाव अबाधित राहावा, यासाठी सातत्याने विविध विधायक उपक्रम राबविणे अत्यंत आवश्यक आहे. विविध जाती, धर्म, पंथ, भाषा आणि संस्कृती असलेल्या भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एकता आणि सामाजिक सदभावना हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.

आजच्या काळात समाजमाध्यमां वरील अफवा, गैरसमज, धार्मिक व जातीय तेढ तसेच परस्परां बद्दल वाढणारे गैरसमज यामुळे सामाजिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत समाजामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आणि एकमेकांच्या भावना व विचारांचा आदर करण्याची संस्कृती रुजवणे गरजेचे आहे.असे नमुद करत,यासाठी विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला संघटना, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. सर्वधर्मीय स्नेहमेळावे, शांतता रॅली, संविधान जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान आणि सामाजिक ऐक्याचे उपक्रम आयोजित केल्यास समाजातील विविध घटकांमध्ये संवाद आणि आपुलकी वाढण्यास मदत होईल. विशेषतः तरुण पिढीमध्ये बंधुभाव, सहिष्णुता, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे महत्त्वाचे आहे. मतभेद असले तरी मनभेद होऊ नयेत, हा विचार प्रत्येकाने आपल्या आचरणातून जपला पाहिजे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सत्यता पडताळणे आणि समाजात शांतता राखण्यासाठी जबाबदारीने वागणे ही प्रत्येक नागरिकाची भूमिका असली पाहिजे. सामाजिक सदभावना ही केवळ एखाद्या दिवसापुरती किंवा कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विश्वास, प्रेम, समानता आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे.

देशाची प्रगती, राज्याचा विकास आणि समाजाचे उज्ज्वल भविष्य हे सामाजिक ऐक्याशी जोडलेले आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात शांतता, एकोपा व सदभावना कायम राहावी यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

-----------------------------------------------

*वृत्त विशेष सहयोग*

ज्येष्ठ पत्रकार आबीद खान 

अ.नगर - 9860477869

----------------------------------------------

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments