adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

केळी पीक विमा चे निकष पूर्ववत करा....निकष बदलणे म्हणजे नुकसान होत नाही असे नाही,फक्त भरपाई द्यावी लागू नये हेच सरकारचे धोरण,कृषी आयुक्तांना शेतकरी कृती समितीचे निवेदन गेल्या दोन वर्षांपासून सरकारने फक्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागते म्हणून खरीप पीक विमा योजना असो की केळी पीक विमा योजना यांचे निकष बदलून फक्त कमीतकमी पैसे कसे द्यावे लागतील यासाठी आदेश काढत आहेत.

केळी पीक विमा चे निकष पूर्ववत करा....निकष बदलणे म्हणजे नुकसान होत नाही असे नाही,फक्त भरपाई द्यावी लागू नये हेच सरकारचे धोरण,कृषी आयुक्तांना ...

केळी पीक विमा चे निकष पूर्ववत करा....निकष बदलणे म्हणजे नुकसान होत नाही असे नाही,फक्त भरपाई द्यावी लागू नये हेच सरकारचे धोरण,कृषी आयुक्तांना शेतकरी कृती समितीचे निवेदन

गेल्या दोन वर्षांपासून सरकारने फक्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागते म्हणून खरीप पीक विमा योजना असो की केळी पीक विमा योजना यांचे निकष बदलून फक्त कमीतकमी पैसे कसे द्यावे लागतील यासाठी आदेश काढत आहेत.


विश्राम तेले चौगाव प्रतिनिधी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

निकष हे झालेल्या नुकसान भरून देण्यासाठी की भरपाई देणे टाळण्यासाठी

खरीप पीक विमा योजनेतील तीन ट्रिगर रद्द करण्यात आले म्हणून यावर्षी दुष्काळात सारे शेतकरी विमा पासून वंचित राहिले, खरंच हे योग्य झाले का?

तसंच केळी पीक विमा योजनेतील निकष हे देखील कृषी विद्यापीठातील विविध तज्ञांनी अभ्यास करून ठरवले होते. कोरोना आधी सरकारने व विमा कंपनी यांनी एकदा हा प्रयत्न केला होता,परंतु सरकारने दुसऱ्यावर्षी आमच्या मागणीचा विचार करून पुन्हा बदल केला होता.

कारण जेव्हा लागवडीचे वाण एक ज्याला लागणारे तापमान सारखे मग २१जिल्ह्यात वेगळा निकष व ५ जिल्ह्यांना वेगळा निकष हे कोणत्या अभ्यासात आहे?

हे वास्तव आहे की जगातील बदललेले वातावरणामुळे(Global warming) गेल्या काही वर्षांपासून वरील २१ जिल्ह्यातील शेतीचे नुकसान होत आहे त्यामुळे आपणास थोडे जास्त पैसे विम्याचे द्यावे लागत आहे हे मान्य...त्यासाठी दुसरे मार्ग शोधले पाहिजे, जसे की राज्यसरकार व केंद्रसरकार यांचे हिश्यांची रक्कम वाढवणे.

यावेळी शिष्टमंडळाने कोकणातील रत्नागिरी/देवगड चे हापूस आंब्याची चव ही वेगळी,तसे जळगाव जिल्ह्यातील केळी ची चव ही वेगळी त्याला तेथील माती तील गुणधर्म जबाबदार आहे,म्हणून तेथे केळी लागवड बंद व्हावी हे राज्याचे हिताचे नाही हे देखील लक्षात आणून दिले.

आपल्या राज्यातील कृषी विभागाने व विद्यापीठांनी बदललेल्या परिस्थितीत केळी चे नुकसान कसे टाळता येईल यासाठी अभ्यास करून मार्ग काढून,साऱ्या राज्याला एकच निकष ठरवावेत अशी विनंती कृषी आयुक्त श्री सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली,त्यात खरीप पीक विमा योजनेतील तीन निकष पूर्ववत करावेत अशी देखील विनंती केली आहे,यावेळी शेतकरी कृती समिती चे समन्वयक एस बी नाना पाटील,डॉ ललित पाटील,शाहिद बागवान हजर होते.

No comments