adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या विकास कामाचे आ. अमोल जावळे हस्ते ३५ कोटींचे शुभारंभ रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने, रिक्रिएशन सेंटर, जलतरण तलावासह विविध नागरी सुविधांचा कामांना समावेश नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक यांची उपस्थिती

  फैजपूरच्या विकास कामाचे आ. अमोल जावळे हस्ते ३५ कोटींचे शुभारंभ रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने, रिक्रिएशन सेंटर, जलतरण तलावासह विविध...

 फैजपूरच्या विकास कामाचे आ. अमोल जावळे हस्ते ३५ कोटींचे शुभारंभ रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने, रिक्रिएशन सेंटर, जलतरण तलावासह विविध नागरी सुविधांचा कामांना समावेश 

नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक यांची उपस्थिती 


इदू पिंजारी फैजपूर प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

फैजपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण पाऊल पडले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर झालेल्या तब्बल ३५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार अमोलदादा जावळे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. या विकासकामांमुळे फैजपूर शहराच्या नागरी सुविधांमध्ये भर पडणार असून शहराच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे व आ. नंदूभाऊ महाजन यांच्या सहकार्याने तसेच आ. अमोल जावळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांनीही या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या भूमिपूजन सोहळ्याला नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, आजी-माजी नगराध्यक्ष, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे शहराच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची भूमिका या कार्यक्रमातून अधोरेखित झाली. विविध क्षेत्रांतील विकासकामांना चालना

या निधीतून शहरातील रस्त्यांचे खडीकरण, काँक्रिटीकरण व डांबरीकरण, गटार बांधकाम, भुसावळ रस्त्याचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण, सार्वजनिक शौचालये, पाणीपुरवठा व्यवस्थेचे बळकटीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय नमो उद्यान, म्युनिसिपल हायस्कूलचे सुशोभीकरण, अभ्यासिका, सामाजिक सभागृह आणि रिक्रिएशन सेंटर यांचाही विकासकामांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. जलतरण तलाव व क्रीडा सुविधांसह शहर सुशोभीकरणाच्या माध्यमातून फैजपूरकरांना आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

फैजपूरच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासोबतच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर ३५ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ हा फैजपूरच्या विकासप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. या कामांमुळे शहरातील विविध भागांतील नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण, क्रीडा आणि मनोरंजन अशा विविध विकासकामे होणार आहेत

No comments