adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मॅसानिक लॉजच्याप्रकरणी आमरण उपोषणाचा इशारा

मॅसानिक लॉजच्याप्रकरणी आमरण उपोषणाचा इशारा भुसावळ प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) भुसावळ - येथील गट नं.100च्या मिळकती तसेच इतर मिळकती ...

मॅसानिक लॉजच्याप्रकरणी आमरण उपोषणाचा इशारा


भुसावळ प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


भुसावळ - येथील गट नं.100च्या मिळकती तसेच इतर मिळकती संदर्भात तथाकथीत कागदपत्रांच्या माध्यमाने खरेदी व विक्री होणारे अनाधिकारी व बेकायदेशीर व्यवहारापासून सर्व सामान्य जनतेस सावध राहण्याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी तक्रार दिली होती. यावर सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी चौकशी करून तहसीलदार भुसावळ यांनी मिळकतीचे अभिलेख तपासून शर्त भंग झाला असल्यास पुढील कार्यवाही करावी व तहसीलदार भुसावळ यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत वाद मिळकत व मॅसेनिक लॉजच्या इतर मिळकतीचे व्यवहार होवू नये यासाठी सदर मिळकती प्रतिबंधीत करण्यात याव्या असे आदेश दिलेले होते. तरी सदरील प्रकरणात भुसावळ तहसीलदार यांनी सह. जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्यामुळे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी दि.16/11/2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. असे पत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयात समक्ष जावून दिले आहे व माहितीस्तव जिल्हाधिकारी व जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.

No comments