पोदार प्रेप अकलूद येथे वार्षिक क्रिडा दिवस उत्साहात साजरा यावल तालुका प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) पोदार प्रेप अकलूद येथे या वर्षी ...
पोदार प्रेप अकलूद येथे वार्षिक क्रिडा दिवस उत्साहात साजरा
यावल तालुका प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
पोदार प्रेप अकलूद येथे या वर्षी
"गेट सेट फॉर ऍक्शन विथ जम्बो
" या थीमसोबत वार्षिक क्रिडा महोत्सव साजरा करण्यात आला.
या वर्षीचा क्रीडा दिवस पोदार प्रेपच्या आमच्या खास वैशिष्ट्यपूर्ण समावेशक उपक्रम - *अॅक्शन मॅट्स* - या विषयावर विचारपूर्वक आखला गेला होता.
या क्रिडा महोत्सवात मुलांनी सक्रिय खेळाचा आनंद घेत, त्यांची स्थूल स्नायू कौशल्ये (ग्रॉस मोटर स्किल्स), समन्वय, संतुलन, चपळता, ताकद आणि आत्मविश्वास यांचा वापर करून पूर्ण उत्साहाने सहभाग नोंदवला.
शाळेचे प्राचार्य आदरणीय सचिन बनसोडे यांच्या सहकार्याने व प्रेरणेने क्रीडामोहत्सवाची तयारी करण्यात आली होती.
या वेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉॅ कविता ब-हाटे, शाळेच्या उपप्राचर्या रेखा मुळे मॅडम, मुख्याध्यापिका मनिषा शृंगी मॅडम तसेच प्रशासकीय अधिकारी राम कुळकर्णी सर यांच्या मार्गद्शनाखाली विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मार्च पास, सूर्यनमस्कार , योगा, नृत्य कला तसेच विविध खेळांच्या स्पर्धा पार पाडल्या.
स्पर्धाचा मुख्य उद्देश मुलांमध्ये
खेळांबद्दल प्रेम वाढवणे, विविध खेळांमध्ये स्वारस्य निर्माण करणे, चिकाटी ,टीमवर्क आणि खेळाडू वृत्ती यासारखी आवश्यक कौशल्ये विकासित करणे हा होता.


No comments