द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवाळीचा उत्सव उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव; रांगोळी, कंदील आणि दीपस...
द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवाळीचा उत्सव उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव; रांगोळी, कंदील आणि दीपसजावटीने शाळा उजळली!
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
म्हसावद : येथील द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०२६ रोजी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक व कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या साकारल्या. तसेच रंगीबेरंगी कंदील तयार करून दिव्यांच्या मनमोहक सजावटीने संपूर्ण शाळेचा परिसर उजळून टाकला.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच भारतीय संस्कृती आणि सण-उत्सवांचे महत्त्वही अधोरेखित झाले.
यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल सौ. संगीता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले. तसेच फटाक्यांचा मर्यादित वापर करून पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आनंददायी दिवाळी साजरी करण्याचा मोलाचा संदेश दिला.
या संपूर्ण कार्यक्रमामुळे शाळेत आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा दिवाळी उत्सव अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला.
भारतीय संस्कृतीचे जतन, पर्यावरणाचे संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा हा दिवाळी उत्सव सर्वांसाठी आनंददायी ठरला.

No comments