adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नूतन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा; पथनाट्य, पोवाडा व चर्चासत्रातून संविधान मूल्यांचा जागर

  नूतन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा; पथनाट्य, पोवाडा व चर्चासत्रातून संविधान मूल्यांचा जागर मलकापूर ...

 नूतन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा; पथनाट्य, पोवाडा व चर्चासत्रातून संविधान मूल्यांचा जागर


मलकापूर (प्रतिनिधी) :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

येथील नूतन विद्यालय व नूतन कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात भारतीय संविधान दिन विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, लोकशाही मूल्यांची जोपासना व्हावी आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजावी, या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. मयूर पाटील व प्रा. दिपाली खर्चे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य प्रभातफेरीने झाली. या प्रभातफेरीच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यात आली. यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक सचिन पाटील यांनी रेल्वेस्थानकाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.

पथनाट्य आणि पोवाड्याने वेधले नागरिकांचे लक्ष

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी परिसरात प्रभावी पथनाट्य सादर केले. यामधून स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूलभूत तत्त्वांचा संदेश देत नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमाचे यशस्वी नियोजन सौ. उज्वला वराडे व सौ. रीता पाटील यांनी केले.

तसेच, इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी तहसील चौकात संविधानाचे महत्त्व विशद करणारा उत्साही पोवाडा सादर केला. या पोवाड्याचे यशस्वी नियोजन अंजली कोलते यांनी केले या उपक्रमात मलकापूर वकील संघानेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

व्याख्यान, चर्चासत्र आणि विविध स्पर्धांचे आयोजन

संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विशेष व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्त्या म्हणून आमंत्रित केलेल्या ॲड. स्वाती पाटील यांनी संविधानाच्या विविध पैलूंवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनुमा इंगळे यांनी केले, तर चर्चासत्र प्रभावी होण्यासाठी संजय कुंभरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या:

• प्रश्नमंजुषा स्पर्धा: सौ. वृंदा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संविधान विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली, ज्यात ४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

• भाषण स्पर्धा: 'माझे संविधान, माझे कर्तव्य' या विषयावर अमित कोलते सरांच्या नेतृत्वाखाली भाषण स्पर्धा पार पडली.

• ⁠चित्रकला स्पर्धा : भारतीय संविधान दर्शवणारे दृश्य या विषयावर आनंदा नारखेडे सर मार्गदर्शनात स्पर्धा पार पडली 

या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री अविनाश बोरले सर उपमुख्याध्यापक श्री प्रशांत खर्चे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

No comments