adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिक्षकांमध्ये आढळतो ज्ञानदान, माणुसकी आणि सेवाभावाचा त्रिवेणी संगम मुख्याध्यापिका संगीता फिरके

शिक्षकांमध्ये आढळतो ज्ञानदान, माणुसकी आणि सेवाभावाचा त्रिवेणी संगम मुख्याध्यापिका संगीता फिरके   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक : हेमकांत गायक...

शिक्षकांमध्ये आढळतो ज्ञानदान, माणुसकी आणि सेवाभावाचा त्रिवेणी संगम मुख्याध्यापिका संगीता फिरके 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 न्हावी. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देताना सामाजिक बांधिलकी जपणारे, गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणारे आणि माणुसकीचा धर्म कृतीतून जपणारे प्रवीण मधुकर वारके सर यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्ञानदान, माणुसकी आणि सेवाभावाचा त्रिवेणी संगम आहे, असे गौरवोद्गार भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य संगीता फिरके यांनी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात दरम्यान केले. 

शारदा माध्यमिक विद्यालय, न्हावी येथील उपशिक्षक प्रवीण वारके यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवापूर्तीच्या निमित्ताने फिरके परिवारातर्फे आयोजित सेवापूर्ती–सेवामूर्ती सन्मान सोहळ्यात त्या मनोगत व्यक्त करताना बोलत होत्या. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष आता वड्री विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक जयंत चौधरी, बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, माजी मुख्याध्यापक युवराज वाघुळदे , सौ.सुरेखा वाघुळदे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रवीण वारके सरांच्या शैक्षणिक, सामाजिक, सहकारविषयक आणि सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, वारके सरांनी ज्ञानदानासोबतच माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपली आहे. गरजू व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांची धडपड प्रेरणादायी असून, त्यांचे सेवाकार्य समाजासाठी आदर्श आहे. 

       ललितकुमार फिरके म्हणाले की, वारके सर म्हणजे मैत्री जपणारे आणि माणसे जोडणारे दिलदार व्यक्तिमत्त्व आहे. दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा त्यांचा स्वभाव आणि सेवाभावी वृत्ती खरोखरच अनुकरणीय आहे.

जयंत चौधरी म्हणाले की, ज्ञानदानाची तीन दशके, समाजसेवेची अखंड वाट आणि माणुसकीचा सदैव पुढे असलेला हात, अशा बहुआयामी कार्यातून प्रवीण वारके सरांनी सेवापूर्ती बरोबरच 'सेवामूर्ती' ही सार्थ ओळख निर्माण केली आहे.

No comments