adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावलमध्ये संशयातून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या; आरोपी पती साकळी येथून ताब्यात विवाहाला वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच संसाराचा दुर्दैवी अंत; घटनेने यावल शहरात खळबळ

  यावलमध्ये संशयातून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या; आरोपी पती साकळी येथून ताब्यात विवाहाला वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच संसाराचा दुर्दैवी अंत;...

 यावलमध्ये संशयातून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या; आरोपी पती साकळी येथून ताब्यात

विवाहाला वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच संसाराचा दुर्दैवी अंत; घटनेने यावल शहरात खळबळ 


भरत कोळी यावल

(संपादक - हेमकांत गायकवाड) 

यावल शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या आयेशा नगर परिसरातील तिरुपती नगर येथे संशयातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या हत्येनंतर फरार झालेल्या आरोपी पतीला पोलिसांनी साकळी येथून ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयेशा नगरमधील तिरुपती नगर परिसरात शेख साबीर शेख आमिन यांच्या घर क्रमांक ५७० मध्ये आरिफ खान गनी खान हे भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. त्यांचा मोठा मुलगा फरदीन खान आरिफ खान (वय २१) याचे गेल्या वर्षीच मशीराबी फरदीन खान (वय २०) हिच्याशी लग्न झाले होते.

सोमवारी पती फरदीन खान आणि पत्नी मशीराबी हे दोघे घरी असताना त्यांच्यात वाद झाला. कुटुंबातील इतर सदस्य एका लग्नसमारंभासाठी गावात गेले होते. याच दरम्यान झालेल्या वादातून फरदीन खान याने पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता.

सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद, हवालदार वासुदेव मराठे, वसीम तडवी, एजाज गवळी, अर्षद गवळी आणि अलाउद्दीन तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, गुन्हा केल्यानंतर फरदीन खान हा पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला साकळी येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री यावल ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

संशयातून घडलेल्या या भीषण घटनेमुळे यावल शहरात हळहळ व्यक्त होत असून, अवघ्या वर्षभरापूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या दाम्पत्याचा संसार अशा दुर्दैवी पद्धतीने संपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

No comments