चोपडा भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने संविधान सन्मान गौरव दिन साजरा चोपडा प्रतिनिधी :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) भारतीय बौद्ध महासभा च...
चोपडा भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने संविधान सन्मान गौरव दिन साजरा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुका शाखा व शहर शाखा यांचे विद्यमाने,
भारतीय संविधानाच्या गौरवासाठी आणि सामाजिक ऐक्याच्या संदेशासाठी ७७ वा संविधान सन्मान गौरव दिन आयु.एस.व्ही.करंदीकर, कोषाध्यक्ष तथा प्रमुख समता सैनिक दल चोपडा यांच्या अध्यक्षतेखाली
दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
वेळ : सकाळी ८.३० वाजता
स्थळ : डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक चौक चोपडा येथे
भारताच्या लोकशाहीचा पायाभूत स्तंभ —
भारतीय संविधान आणि त्याचे शिल्पकार बोधिसत्व,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला अभिवादन करून तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार एस.व्ही.करंदीकर व चोपडा नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक भोंगे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले .धूपबत्ती ,मेणबत्ती पेटवून त्रिशरण ,पंचशील ग्रहण करण्यात आले. व संविधानाचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय घोष करण्यात आला
यावेळी भारतीय बौध्द महासभा चोपडा तालुका, व शहर शाखा पदाधिकारी,धम्म उपासक, उपासिका,माजी श्रामनेर, बौद्धचार्य,समता सैनिक दलाचे सैनिक तसेच अध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ,शालिग्राम करंदीकर,वसंत बाबुराव शिंदे, सुकदेव लक्ष्मण बाविस्कर,सुदाम बाबुराव ईशी,रमेश गोबा सोनवणे, जानकीराम शंकर सपकाळे,शिवाजी किसन सोनवणे, संजय पिरा अहिरे ,सचिन बाविस्कर ,अनिल गोरख वाडे, देवानंद यशवंत वाघ,रामचंद्र अमृत आखाडे,राहुल सपकाळे,संतोष वाघ, सोनवणे हिगोणा, आदी समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन भरत भिमराव शिरसाठ यांनी केले.आभार रामचंद्र अमृत आखाडे यांनी मानले.

No comments