जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नायगाव येथे भारतीय संविधान दिवस साजरा नायगाव प्रतिनिधी :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) शाळेमध्ये शासनाकडून ...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नायगाव येथे भारतीय संविधान दिवस साजरा
नायगाव प्रतिनिधी :-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
शाळेमध्ये शासनाकडून आलेल्या परिपत्रकानुसार भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक निवृत्ती गोपाळ भिरूड यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केले व अभिवादन करून विविध उपक्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून प्रतिज्ञा घेतली व प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला, विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर ग्रेडेड मुख्याध्यापक निवृत्ती भिरूड ,शिक्षिका भारती गुलाबराव पाटील, उपशिक्षक भरत भिमराव शिरसाठ यांनी संविधान दिना विषयी आपल्या मनोगतात महत्व सांगितलं तसेच ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने संविधाना दिनाविषयी भाषण केले तसेच प्रश्नमंजुषा मध्ये सहभाग घेतला व ज्यांच्या नंबर आला त्यांना शाळेतर्फे मुख्याध्यापकांनी पेन बक्षीस दिले .
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भरत भिमराव शिरसाठ यांनी केले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

No comments