adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारतरत्न इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त चोपड्यात अभिवादन

 भारतरत्न इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त चोपड्यात अभिवादन   चोपडा प्रतिनिधी (संपादक - हेमकांत गायकवाड)  चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट...

 भारतरत्न इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त चोपड्यात अभिवादन  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक - हेमकांत गायकवाड) 

चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने भारतरत्न, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आयर्न लेडी स्वर्गीय श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा. भैय्यासाहेब ॲड संदीप सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी इंदिराजी गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देत देशाच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण केले. देशाच्या एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील, असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले.

इंदिराजी गांधी यांनी आपल्या कणखर नेतृत्वातून जागतिक स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे धाडसी निर्णय, दूरदृष्टी आणि देशसेवेप्रती असलेली निष्ठा भारतीय इतिहासात सदैव स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष मोहन पाटील, शहराध्यक्ष अशोक साळुंखे, मधुकर बाविस्कर,माजी शहरअध्यक्ष के डी चौधरी,विक्रम पाटील,जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर सांगोरे,अजबराव पाटील,जिल्हा सचिव संजीव सोनवणे,एस डी पाटील,नगरसेवक रमाकांत ठाकूर, अमोल पाटील, किरण सोनवणे,दिलीप साळुंखे,जयवंतराव पाटील,किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे,प्रकाश चौधरी,देविदास साळुंखे,एम एन शिंदे, सुमित पाटील,माणिक पाटील, डॉ रवींद्र पाटील,अशोक पाटील, देवानंद शिंदे, शांताराम लोहार, भरत पाटील, रमाकांत सोनवणे, दीपक चौधरी, इलियास पटेल,अकिल शेख, नितीन पाटील ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments