adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मॅसानिक लॉजच्याप्रकरणी तहसीलदारांचे सह दुय्यम निबंधकांना आदेश

 मॅसानिक लॉजच्याप्रकरणी तहसीलदारांचे सह दुय्यम निबंधकांना आदेश  भुसावळ प्रतिनिधी (संपादक - हेमकांत गायकवाड)  भुसावळ - येथील मॅसानिक लॉज इतर ...

 मॅसानिक लॉजच्याप्रकरणी तहसीलदारांचे सह दुय्यम निबंधकांना आदेश 


भुसावळ प्रतिनिधी

(संपादक - हेमकांत गायकवाड) 

भुसावळ - येथील मॅसानिक लॉज इतर मिळकती व्यवहार होवून नये सदर मिळकती प्रतिबंधित करण्यात याव्या, आपल्या स्तरावरून नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात यावी असे आदेश तहसीलदार भुसावळ यांनी सह दुय्यम निबंधक यांना दिले.

याबाबत माहिती अशीकी, येथील मॅसानिक लॉज तसेच इतर मिळकती संदर्भात तथाकथीत कागदपत्रांच्या माध्यमाने खरेदी व विक्री होणारे अनाधिकारी व बेकायदेशीर व्यवहारापासून सर्व सामान्य जनतेस सावध राहण्याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी तक्रार दिली होती. यावर सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी चौकशी करून तहसीलदार भुसावळ यांनी मिळकतीचे अभिलेख तपासून शर्त भंग झाला असल्यास पुढील कार्यवाही करावी व तहसीलदार भुसावळ यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत वाद मिळकत व मॅसेनिक लॉजच्या इतर मिळकतीचे व्यवहार होवू नये यासाठी सदर मिळकती प्रतिबंधीत करण्यात याव्या असे आदेश दिलेले होते. याबाबत कोणतीही अंमलबजावणी केली नसल्यामुळे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. यानंतर भुसावळ तहसीलदार यांनी दखल घेत मॅसानिक लॉज इतर मिळकती व्यवहार होवून नये सदर मिळकती प्रतिबंधित करण्यात याव्या, आपल्या स्तरावरून नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात यावी असे आदेश सह दुय्यम निबंधक यांना दिले.

No comments