adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल,यावल येथे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी

जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल,यावल येथे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी यावल प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) आज दि. ०४-११-२०२६ रोजी यावल येथील व...

जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल,यावल येथे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी


यावल प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


आज दि. ०४-११-२०२६ रोजी यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल,यावल येथे दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना महाजन होत्या व इंग्लिश मेडियमच्या मुख्याध्यापिका दीपाली धांडे, पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे व गौरी भिरूड उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

दिवाळी सणाची सुरुवात वसुबारस ने होते म्हणून गाय व वासराची पूजा करून वसुबारस साजरी करण्यात आली.

त्यानंतर धनत्रयोदशीला धन्वंतरी व लक्ष्मीपूजन गणेशपूजन करून दिवाळीचा सण आनंदोत्सवाने साजरा करण्यात आला.

या सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी सौ. संस्कृती फेगडे यांनी दिवाळी व भाऊबीज सणांची माहिती दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दीपाली धांडे मॅडम यांनी दिवाळी सणाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. फटाक्यांचा वापर टाळून आनंद, उत्साह आणि सुरक्षिततेने दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

दिवाळीचा खरा आनंद केवळ स्वतःसाठी खरेदी करण्यात नसून, कष्टकरी आणि गरजू लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आहे.

या दिवाळीत मोठ्या दुकानांऐवजी रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या गरीब विक्रेत्यांकडून खरेदी करून त्यांच्या संसाराला हातभार लावूया.असा संदेश फलकलेखनद्वारे विद्यार्थांना देण्यात आला.

एकजूट कल्पकता आणि कलात्मकतेचा सुंदर आविष्कार विद्यार्थ्यांना जुळवून सुंदर आकाश कंदील बनवण्यात आला.

तसेच दिवाळीच्या शेवटच्या सण भाऊबीज हा दिवस विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकमेकांना ओवाळून साजरा केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कविता पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सुरेखा महाजन यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच हा कार्यक्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी रित्या पार पडला आणि उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात दिवाळी सणाचा कार्यक्रम संपन्न झाला

No comments