adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जीसीओईच्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी

जीसीओईच्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी लियाकत शाह जळगाव (संपादक : हेमकांत गायकवाड) जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ ...

जीसीओईच्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी


लियाकत शाह जळगाव

(संपादक : हेमकांत गायकवाड)


जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप निवड प्रक्रियेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. कॉलेजच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना नऊ प्रतिष्ठित आयटी आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये तीन ते सहा महिन्यांच्या दीर्घकालीन इंटर्नशिपच्या संधी मिळाल्या आहेत.

या निवड प्रक्रियेत क्यू स्पायडर्स, ग्लोबल क्रिएटर, एक्सेल आर, युनिक सिस्टीम्स, टेक्नो लर्न, द कोडिंग, सायबर सक्सेस, किरण अकॅडमी आणि विस्डम स्प्रॉट्स आयटी हब यांसह एकूण नऊ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या कंपन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल आणि त्यांची व्यावसायिक कौशल्ये अधिक विकसित होतील.

इंटर्नशिप दरम्यान, विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, हैदराबाद आणि बंगळूरु यांसारख्या प्रमुख आयटी हबमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी देखील मिळेल.

या यशस्वी उपक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे, डीन प्रा. डॉ. तुषार कोळी आणि सर्व विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना वेळेवर मार्गदर्शन केले.

संस्थेतर्फे सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या उज्ज्वल व्यावसायिक भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments