चोपडा विधानसभा क्षेत्रातील नवमतदारांचे मेळाव्याचे आयोजन संपादक:हेमकांत गायकवाड चोपडा येथील भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण मंडल,तसेच भार...
चोपडा विधानसभा क्षेत्रातील नवमतदारांचे मेळाव्याचे आयोजन
संपादक:हेमकांत गायकवाड
चोपडा
येथील भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण मंडल,तसेच भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण मडल युवा मोर्चा आयोजित नवमतदाराचा स्नेहसंमेलन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या स्नेहसंमेलन मेळाव्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संपुर्ण देशभरात विडिओ कॉन्फरन्स द्वारे संबोधन करणार आहेत.सदर कार्यक्रमाला वैशालीताई कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे.चोपडा येथे नव मतदार सम्मेलनाचे आयोजन चोपडा शहरातील स्व.शरदचंद्रीका आक्का पाटील नाट्यगृहात,दिनांक २५ जानेवारी सकाळी १० वाजता ठिकाण नगरपरिषद चोपडा येथे आयोजित करण्यात आले आहे.नवमतदाराला 7820078200 व https://dotook.in या लिंकवर स्वतःची माहीत भरायची आहे.म्हणून प्रथमच नव्याने मतदार नोंदणी झालेल्या मतदारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी.असे आवाहन चोपडा पं.स.चे माजी सभापती तसेच जेष्ठनेते आत्माराम म्हाळके तसेच गोविंद सैंदाणे(चोपडा विधानसभा निवडणूक प्रमुख)तालुकाध्यक्ष चंद्रशेखरदादा पाटील,शहराध्यक्ष नरेंद्रभाऊ पाटील,भाजयुमो तालुकाध्यक्ष रावसाहेब पाटील,भाजयुमो विधानसभा क्षेत्र प्रमुख धनंजय भादले तसेच या अभियानाचे तालुका संयोजक दिपक भोसले,शहर संयोजक विशाल भोई यांनी केले आहे.तरी सदर मेळाव्यास बुथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख,गट प्रमुख गण प्रमुख,व सुपर वाॅरियर्स व पदाधिकारी यांनी नवमतदारांना मेळाव्यास उपस्थित राहणे संदर्भात प्रयत्न करावयाचे आहे.असे भारतीय जनता पार्टी चोपडा शहर व ग्रामीण मंडल कडुन आवाहन करण्यात आले.

No comments