वरखेडे येथील रासेयो शिबिरात विद्यार्थांचे ग्राम स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन अभियान बी. पी. आर्ट्स, एस. एम . ए. सायन्स आणि के के सी कॉमर...
वरखेडे येथील रासेयो शिबिरात विद्यार्थांचे ग्राम स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन अभियान
बी. पी. आर्ट्स, एस. एम . ए. सायन्स आणि के के सी कॉमर्स व के आर कोतकर महाविद्यालय चाळिसगाव आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिर वरखेडे येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी दररोज अनेक उपक्रमाचे आयोजन
चाळीसगाव: प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
बी. पी. आर्ट्स, एस. एम . ए. सायन्स आणि के के सी कॉमर्स व के आर कोतकर महाविद्यालय चाळिसगाव आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिर वरखेडे येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी दररोज अनेक उपक्रमाचे आयोजन केलेले असते. रासेयो शिबिराच्या तिसऱ्या दिवशी वकृत्व स्पर्धा व नृत्य स्पर्धा तसेच चौथ्या दिवशी स्वच्छता अभियान व विद्यार्थ्यांच्या विविध मोफत रक्त चाचण्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी आयोजित वकृत्व स्पर्धेमध्ये सर्वधर्म समभाव, जातीभेद निर्मूलन, व स्त्री भ्रूण हत्या या विषयांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सर्व विषयांवर त्यांचे विचार मांडले. त्यादरम्यान कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे सेनेट सदस्य प्रा. सुनील निकम यांनी भेट दिली व हितगुज केले. विद्यार्थ्यांच्या रासेयो मधील अनुभवाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थांना दररोज श्रमदान करावे लागते. त्यामधून आज विद्यार्थ्यांनी वरखेड गावची स्मशानभूमी सहित संपूर्ण स्वच्छता केली. विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना स्वच्छतेचे तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे दिले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय चाळिसगाव चे कर्मचारी नामदेव अहिरे साहेब , महाले साहेब,केदार साहेब,दीपक ठाकरे साहेब यांचे सहकार्य लागले.या सर्व कर्मचारी यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ.मंदार करंबेळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.प्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.आर. बोरसे , प्रा.दीपक पाटील, प्रा . पंकज वाघमारे , प्रा. रवींद्र पाटील, प्रा. डॉ. दीपाली बंस्वल , प्रा. भारती महाले , महाविद्यालयाचे रासेयो मध्ये घडलेले स्वयंसेवक विद्यार्थी आविष्कार जाधव, अमोल खैरे, दीपक चव्हाण , मोनिका पाटील यांनी स्वयंसेवक विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
No comments