श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा हातेड येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल संपन्न विविध शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या हातेड येथील श्री श...
श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा हातेड येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल संपन्न
विविध शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या हातेड येथील श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा यांची शैक्षणिक सहल
प्रतिनिधी हातेड
संपादक: हेमकांत गायकवाड
विविध शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या हातेड येथील श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा यांची शैक्षणिक सहल दिनांक एक फेब्रुवारी 2024 रोजी ऐतिहासिक स्थळ वेरूळ खुलताबाद तसेच दौलताबाद येथे जाऊन आली सदर सहल एसटी बसणे घेण्यात आली होती या सहलीमध्ये इयत्ता तिसरी व इयत्ता चौथीच्या एकूण 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच या सहलीत शाळेतील पाच शिक्षकांनी सहभाग नोंदविला सदर विद्यार्थ्यांनी प्रथमतः घृष्णेश्वर येथील ऐतिहासिक शिव मंदिरात भेट दिली त्यानंतर छत्रपती शहाजी महाराज यांच्या स्मारकाला भेट दिली त्यानंतर जगप्रसिद्ध वेरूळच्या लेण्यांना भेट दिली मार्गदर्शक शिक्षक श्री अनिल पाटील श्री जयवंत पवार यांनी विद्यार्थ्यांना या संबंधी अधिक ची माहिती दिली त्यानंतर ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यात भेट दिली तेथील इतिहास जाणून घेतला सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला या सहलीसाठी शिक्षिका सौ ज्योती पाटील सौ कल्पना पाटील श्रीमती मनीषा पाटील यांनी सहकार्य केले तसेच क्षेत्रभेट म्हणून इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांची मिनी सहल खाते येतील श्री दत्त मंदिरात देण्यात आली
तेथे विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर केले व वनभोजनाचा आनंद घेतला यासाठी मुख्याध्यापक श्री अनिल पाटील शिक्षक श्री सतीश पाटील व श्रीमती आशा पाटील यांनी सहकार्य केले
No comments