ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या चोपडा शाखेतर्फे सुरु करण्या आलेल्या "ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्या फलकाचे चौगांव येथे तहसीलदार भाऊसाहेब...
ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या चोपडा शाखेतर्फे सुरु करण्या आलेल्या "ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्या फलकाचे चौगांव येथे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते उद्घाटन
चोपडा प्रतिनिधी
संपादक : हेमकांत गायकवाड
चोपडा तालुक्यातील चौगांव येथे आज दिनांक 12/02/2024 वार सोमवार रोजी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या चोपडा शाखेतर्फे सुरू करण्यात आलेल्या "ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्या फलकाचे अनावरण केले.या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार उपस्थितांमधुन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.स्थानिक नागरिक संतोष(आप्पा)पाटील यांच्या पुढाकारातुन एक चांगला उपक्रम गावात सुरू झाला
असुन.नागरिकांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले.मनोगतात उपस्थितांशी संवाध साधतांना तहसीलदार यांनी ह्या मार्गदर्शन केंद्राच्या उपयुक्तता का व कशी हे अनेक उदाहरणांतुन दाखले देत विषद केले.स्थानिक प्रश्न गांव पातळीवरच संवाद व समन्वयातूनच सोडविता येतील असे हि ते म्हणालेत.यावेळी जनतेतून आलेल्या अनेक तक्रारी भाऊसाहेब थोरात,तहसीलदार यांनी स्वीकारल्या.रेशन बाबतच्या तक्रारी तेथल्या तेथेच पुरवठाविभागाकडे देऊन तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.व इतर तक्रारी अधिक चौकशी साठी सोबत नेल्यात.या प्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे जिल्हा सचिव व अशासकीय सदस्य जि.ग्रा.परीषद जळगांव चे उदयकुमार अग्निहोत्री,चोपडा तालुका पुरवठा निरीक्षक देवेंद्र नेतकर,चोपडा ग्रा.पं.महा.चे तालुका सचिव भुपेद्रभाई गुजराथी,चोपडा ता.ग्रा.पं.महा.उपाध्यक्ष महेश पोतदार,डाॅ.पृथ्वीराज सैंदाणें,अनिल बारी,विजय पाटील,संतोष पाटील सर,राजेश खैरनार सह अनेक गांवकरी बंधु,भगिनी उपस्थित होते.आभार प्रदर्शन चौगांवचे तलाठी भुषण पाटील यांनी केले.



No comments