adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा टॅलेंट हंट( CTH) परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

  चोपडा टॅलेंट हंट( CTH) परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न इयत्ता 1 ली, 4 थी आणि 7 वी च्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या या ...

 चोपडा टॅलेंट हंट( CTH) परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

इयत्ता 1 ली, 4 थी आणि 7 वी च्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.



चोपडा प्रतिनिधी 

संपादक: हेमकांत गायकवाड 

इयत्ता 1 ली, 4 थी आणि 7 वी च्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.चोपडा तालुक्यातील स्टेट बोर्ड तसेच CBSE माध्यमाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थांनी या परीक्षेत सहभाग नोंदविला.चोपडा टॅलेंट हंट आयोजन समिती मार्फत परीक्षेसाठी मोठी आकर्षक बक्षिसे विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेत याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांना या परीक्षेकडे आकर्षित करणे तसेच या स्पर्धेच्या युगात त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी  सज्ज करणे होय.या प्रसंगी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले, कवी विलास पाटील,पवन लाठी सर,महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन एस सोनवणे पी व्ही एम इंग्लिश स्कुलचे प्राचार्य श्री रजिश,पत्रकार श्री ओली हे प्रमुख अतिथी होते.चोपडा शहरातील आणि तालुक्यातील विविध शाळांमधील 1324 विदयार्थ्यांनी विविध पारितोषिके पटकवली.एकूण 150 विदयार्थ्यांना आकर्षक बक्षीसे म्हणून सायकल,स्मार्ट वॉच,स्टडी टेबल,रायटिंग पॅड,लेटेस्ट बॅग,ड्रॉइंग किट असे  देण्यात आली.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी आयडियल इंग्लिश अकॅडमीचे संचालक श्री पद्माकर पाटील सर,गुरु क्लासेस संचालक अश्विनी कुमार चौधरी सर तसेच समर्थ मॅथ्स अँड सायन्स अकॅडमी संचालक घनश्याम पाटील सर व विशाल मराठे सर यांनी मुख्यतःपरिश्रम घेतले. परीक्षेच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी अनेक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून परिश्रम घेतलेत व आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

No comments