सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे दि 30 /01/24आणि 31/01/24 र...
सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे दि 30 /01/24आणि 31/01/24 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती डॉ. वर्षा खडके मॅडम तसेच डॉक्टर नारायण खडके यांची होती
प्रतिनिधी: किरण पाटील
संपादक: हेमकांत गायकवाड
सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे दि 30 /01/24आणि 31/01/24 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती डॉ. वर्षा खडके मॅडम तसेच डॉक्टर नारायण खडके यांची होती. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अभ्याक्रमातून विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव, मिळतो ,कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी तसेच सहकार्याची भावना सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजते असे सांगितले. तसेचकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव शिक्षणशास्त्र प्र शाळा विभाग प्रमुख डॉक्टर मनीषा इंदाणी या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात येणाऱ्या समस्या कसे सामोरे जावे आणि आनंदी जीवनाची त्रिसूत्री सांगितली.सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ जयश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले .दि.30 तारखेला आनंद मेळा. रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा एकमिनिट स्पर्धा . फॅशन शो अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या परीक्षक म्हणून अमृत प्री प्रायमरी स्कूलच्या संचालिका अश्विनी अमृतकर व अपर्णा राजहंस यांनी काम पाहिले. दि. 31 ताखेला सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी यांनी आपले कौशल्य कला गुण सादर केले. क्रीडा स्पर्धेत आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका रचना कावणा, उमेश धनगर आणि यांनी केले . विद्यार्थी शिक्षकांनी विविध नृत्य, नाटक, गायन तसेच फॅन्सी ड्रेस इत्यादी कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयतील प्रभारी प्राचार्य डॉ अनिता वानखेडे,डॉ प्रतिभा पाटील,डॉ अनिता जावे, डॉ जयश्री पाटील प्रा. सुवर्णा अहिरे,प्रा निधी शर्मा प्रा.बसरा पवारा,अरविंद पवार , पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे प्रथम आणि द्वितीय विद्यार्थी शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
प्रतिनिधी किरण पाटील



No comments