बदलत्या जीवनशैली मुळे विद्यार्थांवर परिणाम होत आहे. - डॉ.तुकाराम झालटे जि.प.मराठी उच्च प्राथमिक शाळा,इसरखेड नवे केंद्र-मोमीनाबाद येथे लहान...
बदलत्या जीवनशैली मुळे विद्यार्थांवर परिणाम होत आहे. - डॉ.तुकाराम झालटे
जि.प.मराठी उच्च प्राथमिक शाळा,इसरखेड नवे केंद्र-मोमीनाबाद येथे लहान वयात विद्यार्थाना मधूमेह,लठ्ठपणा व डोळ्यांचे विकार यावर प्रतिबंधात्मक उपाय व किशोरवयीन विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्र याबद्दलचे शिबीर आयोजित
मलकापूर विभाग प्रमुख
विशेष प्रतिनिधी अमोल बावस्कार
संपादक: हेमकांत गायकवाड
*नांदुरा:-*जि.प.मराठी उच्च प्राथमिक शाळा,इसरखेड नवे केंद्र-मोमीनाबाद येथे लहान वयात विद्यार्थाना मधूमेह,लठ्ठपणा व डोळ्यांचे विकार यावर प्रतिबंधात्मक उपाय व किशोरवयीन विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्र याबद्दलचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.देवीदासभाऊ तायडे मा.सरपंच व प्रमुख पाहुणे व तज्ञ मार्गदर्शक म्हणून मा. श्री.तुकाराम झालटे साहेब आणि शा. व्य. समिती अध्यक्ष मा.श्री विजयभाऊ मुंढे व श्री बाळूभाऊ कांडेलकर व अंगणवाडी सेविकाताई व गावातील विद्यार्थिनीं उपस्थित होत्या.शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल दाबेकर सर यांनी प्रास्ताविक सांगून सर्वांचे स्वागत केले डॉ.झालटे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शाळेला एक वेगळं वळण देऊन शाळा ही खरोखर रित्या गावाची आत्मा असते व त्याचे सुशोभीकरण करून एक आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण केल्याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले तर आभार प्रदर्शन श्री जीवन राऊत सर यांनी केले.


No comments