विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्यांच्या फायद्यासाठी ??? शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांचा सरकारला सवाल शेतकरी गेल्या तीन...
विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्यांच्या फायद्यासाठी ???
शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांचा सरकारला सवाल
शेतकरी गेल्या तीन चार वर्षांपासून नैसर्गिक व अवकाळी संकटांना तोंड देत आहे.एकीकडे अर्थिक संकट तर दुसरीकडे विमा कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
चोपडा प्रतिनिधी
संपादक : हेमकांत गायकवाड
शेतकरी गेल्या तीन चार वर्षांपासून नैसर्गिक व अवकाळी संकटांना तोंड देत आहे.एकीकडे अर्थिक संकट तर दुसरीकडे विमा कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.जळगाव जिल्ह्यातील सुमारे ७७९६७ शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी झाले होते त्या पैकी २३००० शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक विम्याची रक्कम मिळालेली आहे. ४३५४३ शेतकऱ्यांना आजही पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आंदोलन करावे लागते आहे.त्यांतच खरीप हंगामातील ४,५५७३२ शेतकऱ्यांनी कापूस व इतर पिकांचे विमा काढला आहे त्यापैकी फक्त १७४६५ शेतकऱ्यांना कापूस पीकाचा अग्रिम रक्कम मिळालेली आहे ४३८२६५ शेतकऱ्यांना कापूस पीकाचा विम्याची रक्कम मिळालेली नाही.जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमाधारक ४३५३४ + ४३८२६५ (कापूस व इतर) असे एकूण=४८१८०१ शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.असं मत शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी उपस्थित केला आहे.
संप्टेबंर महिन्यात अवकाळी पावसामुळे कापसासह इतर सर्व पिकांचे नुकसान झाले होते त्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनी कडे नुकसानीच्या तक्रारी केल्या होत्या व पिक विमा कंपनी कडून नुकसानग्रस्त शेतावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून जवळपास चार महिने झाले तरी त्या शेतकऱ्यांना अजूनही पिक विम्याची रक्कम मिळाली नाही.तोच प्रकार केळी पिक विम्याचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतावर केळी पीक उभं असताना ही पिक विमा पॉलिसी रद्द करण्यात आल्या आहेत.राज्याचे कृषी मंत्री म्हणत होते की शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळेल तेंव्हाच दिवाळी साजरी करू मात्र शेतकऱ्यांचं दिवाळे निघाले तरीही सरकार दखल घेत ना.पिक विमा कंपन्यांना मात्र सबसिडी वेळेवर जमा होते तरीही पिक विमा कंपनी वेळेवर शेतकऱ्यांना पैसे देत नाही ही वस्तुस्थिती आहे पंतप्रधान फसल पिक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या भले साठी आहे का कंपनी च्या भल्यासाठी आहे ही संशोधनांची बाब आहे.

No comments