adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

  घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्याला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश... चोपडा शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील सातपुडा हॉटेल...

 घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्याला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश...

चोपडा शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील सातपुडा हॉटेल जवळ सापळा रचुन आरोपीस जागीच पकडले.



प्रतिनिधी  चोपडा 

(संपादक  : हेमकांत गायकवाड)

चोपडा शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील सातपुडा हॉटेल जवळ सापळा रचुन आरोपी सुनिल बारेला यास जागीच पकडले असुन त्याची चौकशी करून त्याला नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिल उर्फ लंबु अमरसिंग बारेला वय २५ रा. गौ-यापाडा ता. चोपडा जि. जळगांव ह.मु. पाटाच्या चारीच्या बाजुला, चोपडा असे सांगितले 

अधिक माहिती अशी की 

 मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जळगांव जिल्हयात चोरी व घरफोडीचे गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे पथकातील अंमलदार यांनी चोपडा येथे जावुन गोपनिय माहिती काढुन चोपडा शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील सातपुडा हॉटेल जवळ सापळा रचुन आरोपी सुनिल बारेला यास जागीच पकडले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिल उर्फ लंबु अमरसिंग बारेला वय २५ रा. गौ-यापाडा ता. चोपडा जि. जळगांव ह.मु. पाटाच्या चारीच्या बाजुला, चोपडा असे सांगीतले. त्याचे ताब्यात होन्डा कंपनिची शाईन मो.सा. क्रं. MP46MT9158 ही मिळुन आली त्या बाबत त्यास विचारपुस करता त्याने उडवा उडविचे उत्तरे दिल्याने सदर मोटर सायकचे चेचीस नंबर वरुन माहीती घेतली असता सदर मोटर सायकलचा रजि. क्रमांक MH19DW1640 असा मिळुन आला त्यावरुन त्यास अधिक विचारपुस करता त्याने सदरची मोटर सायकल मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगांव येथुन चोरी केलेली आहे बाबत सांगीतले त्यावरुन अधिक चौकशी केली असता सदर मोटर सायकल बाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. क्रं. ५०/२०२४ भा.द.वि. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन 

जळगांव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. ०१/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणेच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सुनिल उर्फ लंबु अमरसिंग बारेला रा. गौ-यापाडा ता. चोपडा जि. जळगांव हा चोपडा शहरात असल्याची गोपनिय माहिती मा. पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिनस्त अमलदार पोहेकॉ संदीप रमेश पाटील, प्रविण जनार्दन मांडोळे, कमलाकर भालचद्रं बागुल, पोकों/सचिन चौधरी, चालक महेश सोमवंशी अशा पोलीस अंमलदाराचे पथक तयार करुन त्यांना चोपडा येथे रवाना केले होते.

आरोपी सुनिल उर्फ लंबु अमरसिंग बारेला वय २५ रा. गौ-यापाडा ता. चोपडा जि. जळगांव ह.मु. पाटाच्या चारीच्या बाजुला, चोपडा याला  पोलीस स्टेशन मुक्ताईनगर येथे गुन्हयाचे पुढील तपासकामी  हजर केले आहे 


No comments