भारतीय जनता पार्टी चोपडा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सामुहिक राजीनामे मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष...
भारतीय जनता पार्टी चोपडा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सामुहिक राजीनामे
मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांना सादर करण्यात येणार राजीनामे
प्रतिनिधी चोपडा
( संपादक: हेमकांत गायकवाड )
अधिक माहिती अशी की रावेर लोकसभा निवडणुकीत रक्षा ताई खडसे यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी घोषित करण्यात आली असून यात चोपडा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तरी भा.ज.पा.महाराष्ट्र प्रदेश मा.चंद्रशेखर बावनकुळे यांना सामुहिक राजीनामे सादर करणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे
आपणास कळवितो की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे रावेर लोकसभा निवडणुकीत चुकीचा उमेदवार दिल्याने आम्ही चोपडा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक रजिनामे सादर करीत आहोत.




No comments