adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

०४ रावेर लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता ८३ दिवस ( लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४)

  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी ०४ रावेर लोकसभा मतदारसंघ तथा तहसिलदार चोपडा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण पोल...

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

सहा. निवडणूक निर्णय अधिकारी ०४ रावेर लोकसभा मतदारसंघ तथा तहसिलदार चोपडा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ नविन प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय चोपडा येथे बैठक संपन्न झाली.



प्रतिनिधी चोपडा

( संपादक: हेमकांत गायकवाड )

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४   च्या अनुषंगाने  सहा. निवडणूक निर्णय अधिकारी  ०४ रावेर लोकसभा मतदारसंघ तथा तहसिलदार चोपडा  यांच्या अध्यक्षतेखाली ०४ रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत १०- चोपडा  (अ.ज.) मतदारसंघातील सर्व विभागातील विभाग प्रमुख  यांची दिनांक १७ मार्च २०२४ रोजी सकाळी १२.०० वाजता  ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ नविन प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय चोपडा येथे बैठक संपन्न झाली.



       सदर बैठकी मध्ये मा.तहसिलदार यांनी दिनांक १६ मार्च २०२४ रोजी मा.भारत निवडणूक आयोग यांनी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकची आचारसंहिता घोषित करून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.  ०४ रावेर लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता ८३ दिवस असून महाराष्ट्रात ५ टप्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. जळगाव व ०४  रावेर मतदारसंघांतील निवडणूक १३ मे रोजी आहे. त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी यांनी सार्वजनिक जागेतील पोस्टर, मिरवणूकितील घोषणा फलक , बोर्ड ,जाहिराती, पक्षाचे झेंडे काढण्यासाठी सुचेना दिल्या. तसेच आचारसंहिता सुरु झाल्यापासून शासकीय कार्यालयातील २४ तासात , शासकीय मालमत्तावरील ४८ तासात व खाजगी जागा, मालमत्तावरील  ७२ तासात  काढण्यात यावे, अश्या सूचना दिल्या. तसेच खाजगी जागेत पोस्टर, बोर्ड, जाहिराती लावण्यासाठी महसूल विभाग , पोलीस विभाग , नगरपालिका इ .विभागाची परवानगी असणे बंधनकारक आहे. तसेच मा. पोलीस निरीक्षक यांनी निवडणुकी संबधित प्राप्त तक्रार निवारण कक्षाची व सुरक्षा कक्षाची पाहणी केली.  

सदर बैठकीस सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी मा. श्री .रमेश वाघ,  मा. पोलीस निरीक्षक श्री एम डी साळवे (शहरी) मा. पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर (ग्रामीण), मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संतोष चव्हाण (अडावद) निवडणुक नायब तहसिलदार श्री .सचिन बांबळे अधिकारी सर्व शासकीय वा निम शासकीय कार्यालयांचे प्रमुख इ.कर्मचारी उपस्थित होते.

No comments