adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एक गावठी बनावटी कट्टा व तीन काडतुसासह संशयित आरोपी जेरबंद

  एक गावठी बनावटी कट्टा व तीन काडतुसासह संशयित आरोपी जेरबंद  चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई सञासेन गावाचे हद्दीत वन विभागाच्या नाक्याजवळ (चे...

 एक गावठी बनावटी कट्टा व तीन काडतुसासह संशयित आरोपी जेरबंद 

चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई सञासेन गावाचे हद्दीत वन विभागाच्या नाक्याजवळ (चेकपोस्ट) 

चोपडा ग्रामीण पोलिसांचे राञीचे गस्ती पथक गस्ती करत असतांना कारवाई 



चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

चोपडा:-

 तालुक्यातील सञासेन गावाचे हद्दीत वन विभागाच्या नाक्याजवळ (चेकपोस्ट) दिनांक २३/०३/२०२४ रोजी ०९ वाजेच्या सुमारास आरोपी रोहीत दिवाकर वाघमारे हा चोपडा ग्रामीण पोलिसाचे राञीचे गस्ती पथक गस्ती करत असतांना २५,०००/रु किंमतीचा एक गावठी बनावटी कट्टा (पिस्टल)लोखंडी (स्टील)धातुचा तपकीरी रंगाची मुठ असलेले मध्यभागी लाल रंगाचे स्टारचे चिन्ह असून मॅक्झिन सह असलेला आरोपी याचे कमरेत ३०००/- रु किंमत पिवळ्या धातुचे ०३ काडतुस कि.अ ,१०००/- रु रोख त्यात ५०० रु दराच्या ०२ चलणी नोटा आरोपी यांचे पॅन्टचे खिशात,१,५०,०००/- किंमतीची रॉयल इंन्फील्ड कंपनीची बुलेट हन्टर राखडी रंगाची रजि न एम.एच.१७.डी ए.९१९१ अशी एकूण १,७९,०००/- रु मिळुन आले.



पोकॉ पवन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रोहित दिवाकर वाघमारे वय २४ वर्षे रा माळी चिचोरे,ता नेवासा,जि.अहमदनगर हा त्याचे ताब्यात ०१ गावठी अग्नीशस्र कट्टा (पिस्टल)आणि ०३ जिवंत काडतुस हे प्राणघातक अग्नीशस्र असल्याचे माहित असतांना सुध्दा विनापरवाना गैरकायदेशीर आपले कब्जात स्वताचे फायद्याकरीता जवळ बाळगुन रोख रक्कम १००० रु मोटरसायकल सह मिळून आले.याप्रकरणी चोपडा ग्रामीण पो स्टे सीसीटीएनएनस गुरनं.५२/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोनि कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राकेश पाटील हे करित आहे.

No comments