भोंगऱ्या हाट हा पारंपारिक पद्धतीने होळी पूजन खरेदी व संस्कृती जपण्यासाठीच असतो भोंगऱ्या हाट सोमवार पासून ते आज रविवार पर्यंत कर्जाणे गावात...
भोंगऱ्या हाट हा पारंपारिक पद्धतीने होळी पूजन खरेदी व संस्कृती जपण्यासाठीच असतो
भोंगऱ्या हाट सोमवार पासून ते आज रविवार पर्यंत कर्जाणे गावात हर्ष उल्लासात साजरा करत आदिवासी बांधव आपले पारंपारिक वाद्य, ढोल,मांदल,बासुरी, रंगबिरंगी कपडे पेहेराव घालुन नाचत संपन्न
राजेंद्र सोनवणे : प्रतिनिधी चोपडा
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आज भारतातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आदिवासी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदुरबार, धुळे, जळगांव, येथिल पावरा समाजाचा भोंगऱ्या हाट सोमवार पासून ते आज रविवार पर्यंत कर्जाणे गावात हर्ष उल्लासात साजरा करत आदिवासी बांधव आपले पारंपारिक वाद्य, ढोल,मांदल,बासुरी, रंगबिरंगी कपडे पेहेराव घालुन नाचत संपन्न होत आहे या नंतर पुढील आठवडा आदिवासींचा पारंपरिक पद्धतीने होळी (दांडा) ची पूजन करायला सुरुवात होते.आणि यामध्ये काही होळी मध्ये गेर नृत्य करणाऱ्याला बाबूज्या म्हणतात ते नृत्य करण्यासाठी विशेष गाव पाटील मुख्य कडे आपली उपासना पथ्य पाळत असतो. आणि त्याठिकाणी आपलं गेर नृत्य सादर करीत असतात भोंगऱ्या मध्ये आदिवासी बांधव त्याचा पारंपारिक पद्धतीने होळी पूजन करण्यासाठी सामान,जसे फुटाणे, दाव्या,खजूर,खान काकडी, गूळ, इत्यादी खरेदी करून होळी पूजनसाठी करतात.आणि तसेच आदिवासी बांधव आपली सांस्कृतिक जपत असतात.
उपस्थित आदिवासी सामाजिक कार्यकर्ता व उपसरपंच प्रमोद बारेला, ग्रा. स. अनारसिंग बारेला शिवसेना शाखा प्रमुख बबलू बारेला, भावसिंग बारेला, सतीश बारेला गाव पाटील भाया बारेला, गिलदार बारेला, सुरेंद्र बारेला भिकन बारेला सेवा बारेला जतन बारेला अनसिंग बारेला रायसिंग बारेला आंनदराव बारेला शिवराम बारेला करमसिंग बारेला पठाण बारेला इ.होते
आदिवासी सामाजिक कार्यकर्ते व उपसरपंचश्री. प्रमोद बारेला यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले कि
महाराष्ट्रात काही बोगस लोक आदिवासी मध्ये घुसकोरी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु खऱ्या आदिवासी ओडख ही भोंगऱ्या हाट महोत्सवात प्राकृतिक नियमानुसार ढोल मांदल पेहेराव नुसार आपली संस्कृती जपतात
No comments