राज्यात नुकतेच लोकसभा निवडणुकी जाहीर झाले आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली आहे मुक्ताईनगर येथील परि...
राज्यात नुकतेच लोकसभा निवडणुकी जाहीर झाले आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली आहे
मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात नाकाबंदीमध्ये एका संशयित कारमधून २० लाख रुपये किमतीचे २७९ ग्रॅम सोन्याच्या वस्तू आढळून आल्या
प्रतिनिधी मुक्ताईनगर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर :-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात नाकाबंदीमध्ये एका संशयित कारमधून २० लाख रुपये किमतीचे २७९ ग्रॅम सोन्याच्या वस्तू आढळून आले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, राज्यात नुकतेच लोकसभा निवडणुकी जाहीर झाले आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली असून या दरम्यान याच अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शहरातील परिवर्तन चौकात याच पद्धतीने नाकाबंदी असताना मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धुमगहू, पोहेकॉ छोटू वैद्य, पोलीस नाईक प्रशांत चौधरी, प्रवीण जाधव, अभिमान पाटील यांना संशयित कार दिसली. त्यांनी कार थांबवली, त्या कारमधून त्यांनी २० लाख रुपये किंमतीचे २७९ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या वस्तू आढळून आल्या.
दरम्यान याप्रकरणी कारचालक भवरलाल जेटमल जैन रा. जळगाव याने उडवाउडवीचे उत्तर दिले दिले, त्यानुसार पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्यासाठी कारमधील सोन्याचे दागिने जप्त केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक संदीप यांच्यासह पथकाने केली आहे.
No comments