adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पत्रकारिता करणे सोपे नाही तरुणांनी पत्रकारिता क्षेत्राकडे यावं

  पत्रकारिता करणे सोपे नाही तरुणांनी पत्रकारिता क्षेत्राकडे यावं शामसुंदर सोनवणे  नेशन महाराष्ट्र व्यवस्थापकीय संपादक मित्रहो काय लिहावे कोण...

 पत्रकारिता करणे सोपे नाही तरुणांनी पत्रकारिता क्षेत्राकडे यावं

शामसुंदर सोनवणे 
नेशन महाराष्ट्र व्यवस्थापकीय संपादक


मित्रहो काय लिहावे कोणता विषय निवडावा आपल्या समोर या विचारातच होतो एक ना अनेक विषय डोक्यात येत होते पण मत ठामपणे मांडता याव तुम्हाला मोकळेपणाने बोलता याव या विचारात होतो मग इकडचा तिकडचा विषय घेण्यापेक्षा तुमच्या सर्वांचाच परिचयातला विषय पत्रकार व पत्रकारिता हा घेतला आपण बालपणापासूनच पहात आलो एक माणूस सायकलने येतो पेपर असा आवाज जोरात देतो व दारातच पेपर टाकून जातो हे तर झालं पेपर टाकऱ्याचे काम पण यामागील कार्य चालते ते पत्रकार बांधवांवर पत्रकारिता जर नसती तर  आपल्याला देशातील राज्यातील पंचक्रोशीतील माहिती बातम्या समजल्या नसत्या या क्षेत्रात आदर असतो मानसन्मान असतो सर्व काही मिळतं पण मिळत नाही तो फक्त पैसा पत्रकारिता करणं म्हणजे वेळ मिळेल तेव्हा काम करणं ,आज नाही जमलं म्हणून उद्या करेल असं नाही हातातल काम सोडून पत्रकारिता करणं म्हणजे पत्रकार होणं या क्षेत्रात तरुणांनी यायला हवं मि अनेक तरुणांच्या तोंडून ऐकलेय मला डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस, शासकीय नोकरी करायची पण मी पत्रकार होणार असं तरी मी अजून ऐकल नाही असो एका पत्रकाराला बातमीदार ला बातमी (मिळवणं) संकलन करणं पत्रकार परिषदेला उपस्थित राहण म्हणजे खूप दगदग धावपळ होण बातमी मिळाली की तिचे लिखाण करणं मग ऑफिसला पाठवण ति प्रकाशित झाली किंवा नाही याची खातरजमा करण म्हणजेच पत्रकारिता मला पत्रकार बंधूंना होणाऱ्या समस्या ही आपल्याला सांगायच्या आहेत या करीता मी आज आपल्या सर्वांच्या समोर एक नवीन विषय सादर करावा यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे तर मित्रहो आपण सकाळी भल्या पहाटे गरमागरम चहा घेतो तेव्हा सहजच हातात दैनिक, वृत्तपत्र, वर्तमानपत्र मासिक,टि.व्ही.न्युज चॅनल वेबसाईट न्यूज स्मार्टफोन इ. साहित्य वाचायला बघायला घेतो टि.व्ही.न्युज चॅनल वेबसाईट हे आपल्याला देशातील राज्यातील वृत्त विक्षलेण करतात तर आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील माहिती बातम्या वृत्तपत्रे व वेबसाईट स्मार्टफोन मिडिया आपली वृत्तसेवा आपल्या पर्यंत पोहोचवतात हे सर्व शक्य कश्यामुळे होते तर आमचे पत्रकार बांधव यांच्या मुळे जर पत्रकारिता करायची असेल तर हातातील कामे बाजूला सोडावी लागतात व इमानेइतबारे त्या बातमीला न्याय मिळावा या करीता धडपड करत असतात जर एखाद्या वेळेस बातमी प्रसारित प्रकाशित करायला वेळ झाला तर परत परत फोन करतात व्हाट्सअप वर मेसेज करतात का तर त्या घटनेला बातमीला न्याय मिळावा म्हणून मला तुम्हाला सांगायचे एवढेच की पत्रकार हा समाजाचा आरसा मानतात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतात तर मग पत्रकारांसाठी काही प्रमाणात का होईना पण सुखसुविधा योजना उपलब्ध व्हाव्यात खरं तर पत्रकारांना पगार नसतो (ऑफिस मधील पत्रकार बांधवांना पगार कमी प्रमाणात असतो) फक्त समाजसेवा म्हणून ते आपले काम चोख करतात ऑफिस मध्ये कार्यरत असलेल्या पत्रकार बांधवांना रात्री उशिरापर्यंत काम असते दैनिक लवकर छपाई करून तयार करतात त्यांचे गठ्ठे गावागावा नुसार लावतात मग भल्या पहाटे ते वृत्तपत्र गाडी पर्यंत पोहोचवतात पत्रकारीता करणं काही सोपे काम नाही आपले हातातील काम टाकून उन्हातान्हात वृत्त संकलन करण्यासाठी जावे लागते (बातमी घ्यायला जावे लागते )ग्रामीण पत्रकारिता तर फारच वेगळी असते एखाद्या वेळेस कुणाचे नाव सुटले चुकले किंवा बातमी शॉर्ट लागली की लगेच पत्रकार बांधवा जवळ माझे नाव सुटले चुकले ही बातमी तर अशी आली तशी नको पाहिजे होती एक ना अनेक प्रश्न निर्माण करतात खरं तर असे होत नाही पण चुकून प्रिंट मिस्टेक होते हे मात्र खरे तर काही ठिकाणी पत्रकारांवर भ्याडहल्ले हि करतात का कशासाठी तर आमच्या बाबतीत हि बातमी का( लावली) छापून आणली जर तुमच्या विरोधात बातमी घेतली तर काही गौडबंगाल असेल तर म्हणूनच घेतली असेल किंवा काही ठरावीक  ठिकाणी सामान्य जनतेला त्रास होत असेल तर तुमच्या विरोधात बातमी घेतली असेल ना मग पत्रकारावर भ्याडहल्ले करतात भ्याडहल्ले करणाऱ्यावर शासनाकडून कठोर कारवाई करावी अशी आमची प्रमुख मागणी असुन पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत संरक्षण मिळावे हिच अपेक्षा पण कुणी आम्हां पत्रकारांच्या समस्या सोडवेल का कोण म्हणतं पत्रकारांना व्यथा होत नाही समस्या निर्माण होत नाही अहो बस (एसटी) मध्ये प्रवासात असलो की आमचं सिट रिझर्व्ह असतं पण ते आम्हाला मिळतच नाही बातमी संकलनाला  बोलवतात आता (मोबाईलवर पण पाठवतात) एखाद्या कार्यक्रमात साधा सत्कार ही करत नाहीत मि ह्या ग्रामीण भागातील (काही प्रमाणात)बांधवांच्या व्यथा मांडतोय एका गावात किती पत्रकार असतील एक किंवा दोन पण साधी घरपट्टी ग्रामपंचायती माफ करत नाहीत शासकीय योजनांचा लाभ देखील होत नाही पत्रकारांना घरकुल मिळत नाहीत शासनाकडून ना मानधन ना भत्ता तरी आमचें पत्रकार बंधू कुणा कडून काडीची ही अपेक्षा न करता आपले काम निस्वार्थ पणे करतात तरी नगर परिषद असो नगर पालिका असो ग्रामपंचायत असो यांना एवढीच नम्र विनंती की होत असेल तर ( होतेच सगळं तुमच्या हातात आहे) घरपट्टीच बघा तेवढी माफ झाली तरी बरं थोड्या प्रमाणात का होईना पण आमच्या बांधवांना सवलत मिळेल या माध्यमातून आगार प्रमुख यांना ही सांगू इच्छितो आपल्या वाहक, चालकांना सुचना कराव्यात पत्रकार असतील तर तिकीटात सवलत, रिझर्व्ह सिट उपलब्ध करून द्यावीत शासनाकडून येणाऱ्या नवनवीन योजनेत सहभागी करून घ्यावे व पत्रकार कॉलनी स्थापन करून पत्रकार बांधवांच्या घरकुलांचा प्रश्न सोडवावा तर पत्रकारांवर होणारे भ्याडहल्ल्या विरोधात शासनाने पत्रकारांचे संरक्षण करीत हल्लेखोरवर कठोर कारवाई करावी समाजातील प्रश्न आम्ही मांडतो मात्र आमच्या प्रश्नांना बाजूला ठेवून परत आम्ही आमच्या कामात लागतो आम्ही स्थानिक पातळीवर  

 समस्या तर खूप येतात पत्रकारिता करताना या माध्यमातून पत्रकार बांधवांनी ही जागृत व्हाव सामाजिक प्रश्नांन सोबत 

आपले प्रश्न सोडवू या अशी अपेक्षा करतो


शामसुंदर सोनवणे 

नेशन महाराष्ट्र व्यवस्थापकीय संपादक मो.न.८२०८४४९९८३

No comments