श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन चोपडा प्रतिनिधी (संपादक: हेमकांत गायकवाड) चोपडा :- ता...
श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
चोपडा :-
तालुक्यातील लासूर येथे महाशिवरात्री पर्व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गावातील तसेच परिसरातील आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.महाशिवरात्रीनिमित्त विविध देणगीदारांच्या माध्यमातून फराळाचे वाटप करण्यात आले.सकाळी मंदिरावर मंत्र माळ जप करण्यात आला तर सायंकाळी शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला.शिवपार्वती वेशभूषेतील नवयुगलाची गावातून शोभायात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.रात्री श्री नारायण ओझा यांच्या अमृतवाणीतून भजनसंध्या तसेच दि.९ मार्च रोजी संपूर्ण गावासाठी महाप्रसाद देखील श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिरावर करण्यात आले होते.गावात प्रथमच एवढ्या जल्लोषात महाशिवरात्री उत्सव साजरा झाल्याने भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.


No comments