पुजारी भाया पावरा यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन उपस्थितांवर गुलाल उधळून 'गुलाल्या' साजरा सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी उनपदेव ...
पुजारी भाया पावरा यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन उपस्थितांवर गुलाल उधळून 'गुलाल्या' साजरा
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी उनपदेव येथे . आदिवासी बांधवांनी भोंगऱ्या बाजाराचे गुलाल उधळून तसेच बोपदेवाचे पूजन करून श्रीफळ वाढवून आमंत्रित केले
अडावद ता. चोपडा :-
( संपादक हेमकांत गायकवाड )
येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी उनपदेव येथे . आदिवासी बांधवांनी भोंगऱ्या बाजाराचे गुलाल उधळून तसेच बोपदेवाचे पूजन करून श्रीफळ वाढवून आमंत्रित केले तर पुढील संपूर्ण आठवडाभर या भागातील विविध गावांमध्ये भोंगाऱ्या बाजार भरणार आहे.
उनपदेव येथील शरभंगऋषी पाडा येथील ज्या जागेवर भोंगऱ्या बाजार भरतो त्या ठिकाणी सकाळी १० वाजता बोपदेवाची स्थापना करण्यात आली. पुजारी भाया पावरा यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन उपस्थितांवर गुलाल उधळून 'गुलाल्या' साजरा
करण्यात आला. या वेळी पोलीस पाटील देवसिंग पावरा, पुजारा भाया पावरा, आदिवासी सेवक संजीव शिरसाठ, माजी ग्रा.पं. सदस्य अनिल बाविस्कर, शिक्षक सेनेचे प्रमुख चंद्रशेखर साळुंखे, पी. आर. माळी, सचिन महाजन, जितेंद्रकुमार शिंपी, रियाजअली सैयद, जावेदखान पठाण, रायसिंग पावरा, रमेश बारेला, गजाराम पावरा, खुमसिंग पावरा, गाठ्या बारेला, दिलीप बारेला, मधू भील, नायजाबाई पावरा, नानिबाई पावरा, नरसाबई पवार, गणदास बारेला, बालसिंग बारेला, संजय बारेला, सागर पावरा, रतन पावरा, प्रताप बारेला, गेलसिंग बारेला, जगन महाराज यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते.

No comments