जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सन्माननीय व्यापारी बांधवांना आवाहन आपल्या तीनही जिल्ह्यात सेंट्रल जीएसटी व स्टेट जीएसटी चे अधिकारी ...
जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सन्माननीय व्यापारी बांधवांना आवाहन
आपल्या तीनही जिल्ह्यात सेंट्रल जीएसटी व स्टेट जीएसटी चे अधिकारी काही दुकाने व प्रतिष्ठान मध्ये रेड करण्यासाठी व सर्वे करण्यासाठी येत आहेत
![]() |
| फाईल फोटो |
(संपादक : हेमकांत गायकवाड)
व्यापारी बांधवांना कळवण्यात येते की सध्या मार्च एंडिंग सुरू आहे आपल्या तीनही जिल्ह्यात सेंट्रल जीएसटी व स्टेट जीएसटी चे अधिकारी काही दुकाने व प्रतिष्ठान मध्ये रेड करण्यासाठी व सर्वे करण्यासाठी येत आहेत यात काही अधिकारी आता आतीताईपणा करीत आहेत व व्यापारी वर्गाला भयानक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत असे आमच्या कानावर येत आहे यात काही सीए चार्टर्ड अकाउंटंट हे तीनही जिल्ह्यातील काही चांगले असले तरी काही सीए मात्र या अधिकाऱ्यांशी लांगे बांदे ठेवून आपलीच खबर त्यांना देऊन आपल्यावर रेड टाकण्यासाठी त्यांना सहकार्य करतात आणि तोडी पाणी ला हे सर्वात पुढे असतात अधिकाऱ्यांना अर्धे पैसे व स्वतः अर्धे पैसे मारतात असे सुद्धा आमच्या निदर्शनास येत आहे त्यामुळे सर्व व्यापारी बांधवांना आम्ही आवाहन करतो की कोणीही अधिकाऱ्यांना घाबरू नये चोपडा तालुका व्यापारी महामंडळ या गोष्टीसाठी संपूर्ण सक्षम आहे आपण आम्हाला तात्काळ कळवल्यास आम्ही आपल्याला शंभर टक्के न्याय मिळवून देऊ आणि हे सर्व चोपडा तालुका व्यापारी महामंडळाचे पदाधिकारी आपणास पूर्णपणे मोफत मदत करतील आपल्याला एक रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही या अधिकाऱ्यांनी जास्त आतीताईपणा केल्यास सदरच्या गंभीर प्रकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजित दादा पवार व सेंट्रल जीएसटी व स्टेट जीएसटी चे कमिशनर ई डी जे अधिकारी सीबीआयचे अधिकाऱ्यांपर्यंत नेऊन त्यांना निलंबित अथवा बडतर्फ करण्याचा आमच्या मार्फत पूर्णपणे इमानदारीने प्रयत्न करण्यात येईल *आपले स्नेहांकित* *अमृतभाई सचदेव अध्यक्ष चोपडा तालुका व्यापारी महामंडळ*
*मो 9022872567* *सुनील भाई बर्डिया* *कार्यकारी अध्यक्ष दीपक भाई राखेचा*
*वरिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण भाई राखेचा सरचिटणीस*

No comments