केळी कापूस पिक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आमदार खासदार व मंत्री यांना गाव बंदी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून द्यावी तरच आमद...
केळी कापूस पिक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आमदार खासदार व मंत्री यांना गाव बंदी
शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून द्यावी तरच आमदार खासदार व व मंत्र्यांनी गावात प्रवेश करावा अन्यथा गावात येऊ नये वर्डी तालुका चोपडा येथील शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
गेल्या आठ महिन्यापासून केळी उत्पादक शेतकरी पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आंदोलने व निवेदने देत आहेत 12 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विमाधारक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढला होता त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीत ठरले होते की आठ दिवसाच्या आत विमाधारक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळून जाईल मात्र अजूनही केळी उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही विमा कंपनीकडे संपर्क साधला तर कंपनी म्हणते राज्य सरकारने सबसिडी दिली नाही सबसिडी आली की आम्ही शेतकऱ्यांना पैसे देऊ शासन व विमा कंपनी शेतकऱ्यांना फक्त तारीख पे तारीख देत आलेली आहे अशातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या व सगळेच आमदार खासदार मंत्री निवडणुकीच्या रणधुमाळीत मग्न झालेले दिसत आहेत जळगाव जिल्ह्यात केळी विमाधारक शेतकऱ्यांची संख्या 44000 आहे व कापूस व इतर पिकांचा विमाधारक शेतकऱ्यांची संख्या 4,55000 एकुण संख्या केली तर जवळपास 500,000 शेतकरी पिक विमा पासून वंचित असल्याचे दिसत आहेत थोडेफार पैसे आले की सगळेच लोकप्रतिनिधी म्हणतात आम्ही आणले मात्र जेव्हा पैसे येत नाही तेव्हा एकही लोकप्रतिनिधी म्हणत नाही की आमच्यामुळे हे पैसे आले नाहीत आता बस झालं शेतकऱ्यांचा अंत लोकप्रतिनिधी पाहू नये त्यासाठी आता
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिल्याशिवाय आम्ही दिवाळी साजरी करणार नाहीत असं राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणत होते मात्र मार्च एंडिंग जवळ आली शेतकऱ्यांच्या पार दिवाळ निघालं तरीही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही ही शोकांकित आहे
संदीप पाटील, विभागीय अध्यक्ष शेतकरी संघटना

No comments