adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ब्रह्माकुमारीज् उलगडली विविध आध्यात्मिक रहस्ये

 भक्तीमहाशिवरात्री ब्रह्माकुमारीज् तर्फे अनेकाविध कार्यक्रम   ब्रह्माकुमारीज् उलगडली विविध आध्यात्मिक रहस्ये चोपडा प्रतिनिधी  (संपादक:- हेमक...

 भक्तीमहाशिवरात्री ब्रह्माकुमारीज् तर्फे अनेकाविध कार्यक्रम

 ब्रह्माकुमारीज् उलगडली विविध आध्यात्मिक रहस्ये




चोपडा प्रतिनिधी 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्री पर्वानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले . त्यात मुख्य आकर्षण होते ११,१०८ मोतींनी बनलेली शिवलिंग व मानव जीवन दिव्यीकरण आध्यात्मिक प्रदर्शनी.सकाळी विद्यालयाच्या स्थानिक शाखेतर्फे शिवध्वजारोहण करण्यात आले.भाऊसाहेब थोरात (चोपडा तहसिलदार),कैलास पाटील(माजी आमदार)यांच्या शुभहस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी अवगुणमुक्त,व्यसनमुक्त,विकारमुक्त करण्यासाठी शिवप्रतिज्ञाही उपस्थितांना ब्र.कु.मंगला दीदींनी दिली.याप्रसंगी  शहरात रॅली,शिवमंदिरात आध्यात्मिक चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.प्रदर्शनी ठरले भाविकांचे आकर्षण: शहरातील शिवमंदिरात मानव जीवन दिव्यीकरण आध्यात्मिक प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले.त्यात  स्वत:चा वास्तविक परिचय,परमात्म्याची दिव्य कर्तव्य,सृष्टीचक्राचे रहस्य,मृत्यूनंतर काय?मृत्यूपूर्वी काय या सारख्या विविध आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करण्यात आलीत.ब्र.कु.मंगला दिदींनी राजयोगाची विधी आणि अनुभूतीही करविली.नागरीकांना राजयोगाच्या अभ्यास स्थानिक शाखेत विनामुल्य मिळणार असल्याचे आवाहनही आयोजकांनी या प्रसंगी केले.सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ सुरेश बोरोले,ॲड घनश्याम पाटील,पंकज पाटील,सुरेश पाटील,रविंद्र महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओम शांती केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी मंगला दीदी,सारिका दीदी,करिश्मा बेन,काजल बेन,अनिता बेन,वंदना बेन,शुभांगी बेन महेंद्र भोळे,पंकज भाई,ईश्वर भाई,चौधरी सर आदींनी परिश्रम घेतले.

No comments