निमगव्हाण ता.चोपडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी दिनांक 14 रोजी निमगव्हाण ता.चोपडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ...
निमगव्हाण ता.चोपडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी
दिनांक 14 रोजी निमगव्हाण ता.चोपडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती ग्रामपंचायतच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी संपन्न झाली.
प्रतिनिधी चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
सरपंच श्री दिनेश सपकाळे व उपसरपंच सौ उषाबाई पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, महर्षी वाल्मिकी व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.थोर महापुरुषांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घाला.असा संदेश आयोजकांनी इतर समाजाला व ग्रामस्थ यांना देवून एक नवीन आदर्श निर्माण केला.डॉ बाबासाहेब आंबेडकर विषयी घोषणा व घोषवाक्य दिले.
यावेळी ग्रा.पं.सदस्य संजय बिऱ्हाडे, ग्रा.पं.सदस्य धनराज पाटील, वि.सो.सा.चेअरमन डीगंबर पाटील,पोलीस पाटील पवन भील, टेमलाल पाटील,प्रल्हाद पाटील,गयभू पाटील,सुनील भाटिया,ज्ञानेश्वर मोतीराळे,बाळू पाटील, भरत पाटील,दिलीप पाटील,हिलाल बाविस्कर,देवा किराडे,हरेश्र्वर बाविस्कर,नरेंद्र मैराळे वासुदेव बाविस्कर, विकास बाविस्कर,राहुल अहिरे,आनंद बाविस्कर,हर्षल पाटील,शेंनपडू थोरात,अविनाश बाविस्कर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments