लाचखोर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरात ६० लाख रुपयांचे सोन्याचे बिस्कीट,तर कोट्यवधी संपत्तीचे दस्तऐवज जप्त पोलीस निरीक्षक दत्त...
लाचखोर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरात ६० लाख रुपयांचे सोन्याचे बिस्कीट,तर कोट्यवधी संपत्तीचे दस्तऐवज जप्त
पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या राहते घराची धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घर झडती घेतली
दोंडाईचा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
दोंडाईचा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक,दत्तात्रय शिंदे व पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांचे विरूद्ध सापळा कारवाई होवुन त्यांचे विरूध्द दि.०२ रोजी दोंडाईचा पो.स्टे.येथे भ.प्र.अधिनियम कलम ७.७ (अ) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवुन त्यांना अटक करण्यात आली होती.नमुद आरोपीतांना आज दि.२ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ०२ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.दरम्यान आलोसे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या राहते घराची धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घर झडती घेतली असता घर झडती दरम्यान सुमारे ६० लाख रूपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे व दागीणे तसेच सुमारे ७७ हजार रूपयाचे चांदीचे भांडी व दागिणे जप्त करण्यात आली असुन त्यांचे कुटुंबाचे व इतर व्यक्तींच्या नावे सुमारे १ कोटी ७५ लाख रूपयांच्या स्थावर मालमत्तेचे खरेदी खताची दस्ताऐवज जप्त करण्यात आले असुन त्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास धुळे ला.प्र.विभागाचे पोलीस उप अधीक्षक,अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी करीत आहेत.

No comments