मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात ...
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न
रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक
चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक चार एप्रिल रोजी तहसील कार्यालयात पार पडली. अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत त्यांनी सर्व केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात पुन्हा एकदा दिर्घ आजाराने ग्रस्त असणाऱ्या मतदारांची तपासणी करण्याचे आवाहन केले. तपासणीदरम्यान पुन्हा नवीन असे मतदार आढळल्यास त्यांना फॉर्म नंबर 12 ड बाबत माहिती देऊन आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले. अशा मतदारांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्याकरता वाहनांची व्यवस्था करण्यात यावी. सर्व मतदान केंद्रांवर विद्युत पुरवठा, लाईट, फॅन, पिण्याचे पाणी,प्रसाधन व्यवस्था आदी मूलभूत सुविधा अद्यावत करून ठेवण्याबाबत सूचना दिल्या. निवडणुकीच्या या कामात गावातील आशा कार्यकर्ती, पोलीस पाटील, एनसीसी चे विद्यार्थी, स्वयंसेवकांची मदत घेण्यासाठीही प्रेरित केले. स्थलांतरित, मयत मतदारांच्या संदर्भातील मतदार यादी अद्यावत करण्याची सूचना देखील करण्यात आली.
मतदारांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांक १८००२३३००७६ वर किंवा (०२५८६) २२००७६ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच ७८२२८९२५९५ व ९१३०५३५१५६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर तक्रारी नोंदवीण्यात येणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व जबाबदाऱ्या निर्विघ्नपणे पार पाडाव्यात असे आवाहन यावेळी सर्व केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना करण्यात आले.

No comments