adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मतदान जनजागृती संदर्भात मुख्याध्यापकांची बैठक संपन्न

मतदान जनजागृती संदर्भात मुख्याध्यापकांची बैठक संपन्न मुख्याध्यापकांनी शाळेच्या वतीने निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा,पथनाट्य...

मतदान जनजागृती संदर्भात मुख्याध्यापकांची बैठक संपन्न
मुख्याध्यापकांनी शाळेच्या वतीने निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा,पथनाट्य स्पर्धा आदी उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करावी

चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)

 लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक संपन्न झाली. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, स्वीप विभागाचे सहाय्यक नोडल अधिकारी युवराज पाटील आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.
           सदर बैठकीत मुख्याध्यापकांना आपापल्या शाळेत असलेल्या मतदान केंद्राच्या विज, पाणी, पंखा, ट्यूबलाईट आदी. प्राथमिक,मूलभूत सुविधा अद्यावत ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या. मुख्याध्यापकांनी शाळेच्या वतीने निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा,पथनाट्य स्पर्धा आदी उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करावी. शाळेतील नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना स्वेच्छेने मतदान केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून जबाबदारी घेण्यासाठी प्रेरित करावे. शालेय आवारात आणि गावात सार्वजनिक ठिकाणी मतदान करण्यासाठी प्रेरित करणारे जनजागृतीपर फलक, संदेश लावावेत. आपापल्या गावातील बचत गटातील महिलांची निवडणुकीसंदर्भात कार्यशाळा घेऊन त्यांच्यात मतदान जागृती करावी. गावात भजन ,कीर्तन ,लग्न,साखरपुडा असे सामाजिक कार्यक्रमात जनजागृती केल्यास मोठ्या प्रमाणावर मतदानाचा टक्का वाढेल म्हणून मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांना करण्यात आले.

No comments