सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व क्षेत्रिय अधिकारी आणि सर्व नोडल अधिकाऱ्यांनी घेतले ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्...
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व क्षेत्रिय अधिकारी आणि सर्व नोडल अधिकाऱ्यांनी घेतले ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण
प्रतिनिधी चोपडा
(संपादक:हेमकांत गायकवाड)
लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर लोकसभा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन मा.गजेंद्र पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली ०४ रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत १० चोपडा (अ.ज.) मतदारसंघामधील विभाग सेक्टर अधिकारी, नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी यांचे निवडणूक प्रशिक्षण, ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण ३एप्रिल रोजी समिती सभागृहातनगरपालिका चोपडा येथे संपन्न झाले .
सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन मा.गजेंद्र पाटोळे यांनी निवडणूकीबाबत सविस्तर प्रशिक्षण माहिती पीपीटी च्या साहय्याने सेक्टर अधिकारी, नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी यांना निवडणूक प्रकीयेविषयी सविस्तर माहिती सांगितली व उपस्थित प्रश्नांची उत्तरे दिली.मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारमध्ये जाणीव वा जागृकता आपल्या मतदार केंद्रात करावी तसेच, निवडणुकीमध्ये कुठे निर्बंध लागू आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सेक्टर अधिकारी,नोडल अधिकारी यांच्या जबाबदारींचे अवलोकन यावेळी करण्यात आले.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी ईव्हीएम मशीन जोडणी सर्व कर्मचाऱ्यांनी शिकून घ्यावी याबाबत सर्वांना सुचीत केले. निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण सात एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले असून प्रशिक्षणापूर्वी आणि प्रशिक्षणानंतर अधिक माहितीसाठी सर्वांनी माहिती पुस्तिकेचे वाचन करावे असेही आवाहन उपस्थितांना करण्यात आले.


No comments