adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्जाणे येथे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

  कर्जाणे येथे  राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी   राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबे...

 कर्जाणे येथे  राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


 

राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत भारतातली आदिवासी यांना 5 वी 6 वी अनुसूची मध्ये जगण्याचा स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत. याचा मोठा उपकार आहे बाबासाहेबांचा "उप सरपंच श्री.प्रमोद बारेला

चोपडा प्रतिनिधी :-

(संपादक : हेमकांत गायकवाड)

आज दि 14/04/2024 रोजी कर्जाणे गावात वि.प्र.देशमुख प्राथ.व श.पा.माध्य.व कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील उच्च माध्यमिक आश्रमशाळा कर्जाणे तर्फे गावामध्ये मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.सदरप्रसंगी गावात रॅली काढून घोषणा देण्यात आल्या.तसेच कर्जाणे ग्रामपंचायत मध्ये जयंती साजरा करत राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतून लोकशाहीच्या अधिकाराने मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली

राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत भारतातली आदिवासी यांना 5 वी 6 वी अनुसूची मध्ये जगण्याचा स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत. याचा मोठा उपकार आहे बाबासाहेबांचा "उप सरपंच श्री.प्रमोद बारेला यांनी सांगितले 

सदर प्रसंगी कर्जाणे गावाचे उप सरपंच श्री. मा.प्रमोद बारेला, माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगिनी बाविस्कर, प्राथ. मुख्याध्यापक जितेंद्र पाटील, श्री. प्रमोद भालेराव, श्री.रामचंद्र आखाडे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments