वेळोदे येथील ट्रक ड्रायव्हरचा मुलगा झाला फौजदार शुभम पारधी ( पोलीस उपनिरीक्षक ) कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता घरीच ऑनलाईन व ऑफलाइन अ...
वेळोदे येथील ट्रक ड्रायव्हरचा मुलगा झाला फौजदार

शुभम पारधी ( पोलीस उपनिरीक्षक )
कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता घरीच ऑनलाईन व ऑफलाइन अभ्यास करून २०२१ मध्ये प्रीलियम व२०२२ मेन्स परीक्षा पास करून नुकत्याच १२ तारखेला लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती
चोपडा ( प्रतिनिधी )
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील वेळोदे हे गाव जळगाव धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील अनेर नदीच्या काठी वसलेले तीन हजार लोकवस्तीचे गाव, या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने वास्तव्याला आहेत, गावात पारधी समाजाचे जवळपास १०० च्या वर कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यापैकी बंशीलाल आत्माराम पारधी हे दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत आहेत. कुटुंबात शुभम हा मोठा आणि दोन मुली शुभमचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण घोडगाव येथील सी बी निकुम हायस्कूल मध्ये झाले दहावीत त्यांने द्वितीय क्रमांक पटकावला होता.तसेच बारावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालय चोपडा येथे झाले, व बीएससी पर्यंतचे शिक्षण शिरपूर येथील एस पी डी एम कॉलेज येथे पूर्ण केले. २०२० मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करून एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली, कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता घरीच ऑनलाईन व ऑफलाइन अभ्यास करून २०२१ मध्ये प्रीलियम व२०२२ मेन्स परीक्षा पास करून नुकत्याच १२ तारखेला लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती मिळवली. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक उणीव भासू दिली नाही. या कुटुंबात लक्ष्मीचा वरदहस्त कमी असला तरी सरस्वतीचा वरदहस्त मात्र चांगलाच राहिलेला आहे. शुभम पेक्षा लहान असलेली त्याची बहीण शुभांगी ही सीबी निकम हायस्कूल घोंडगाव येथे बारावीत प्रथम क्रमांक पटकावला व डीएड चे शिक्षण पूर्ण करून त्याच संस्थेच्या शाळेत इंग्लिश मीडियम ला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. व लहान बहिण नेहा ही चोपडा येथे बी .ए .चे शिक्षण पूर्ण करीत आहे. शुभमच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शुभमने गावातील एमपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श घातलेला आहे, कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता एमपीएससी पूर्ण करता येते हे दाखवून दिलेले आहे. मुलांचे शिक्षणासाठी आई सुनंदाबाई यांनी देखील खूप परिश्रम घेतलेले आहेत. त्याच्यामुळे यशाचे सर्व श्रेय शुभम याने आपल्या आई वडिलांना दिलेले आहे.
शुभम चे थोडक्यात मनोगत
|| मनोगत ||
मी शुभम सुनंदाबाई बन्सीलाल पारधी,मु पो वेळोदे, ता चोपडा,जि जळगाव .नुकताच दि.१२ एप्रिल २०२४ वार शुक्रवार रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात पोलीस उपनिरीक्षक या पदी माझी निवड झाली.निकाल जाहीर झाल्यापासून नातेवाईक ,मित्रपरिवार तसेच गावकऱ्याकडून शुभेच्छा चा वर्षाव झाला . माझ्या यशात आई वडिलांच्या मोलाचा वाटा आहे, तेच माझे प्रेरणास्रोत आहेत.माझे वडील हे ट्रक चालक आहेत आणि आई गृहिणी आहे.थोडक्यात माझ्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रवासाला मी एप्रिल २०२० पासून सुरवात केली विशेष म्हणजे मी आभ्याससाठी पुणे सारखे ठिकाणी न जाता गावातच घरी राहून तयारी केली .मी पहिल्याच प्रयत्नात या पदाला गवसणी घातली, वेळेचे अचूक व्यवस्थापन आणि अभ्यासात सातत्यपूर्ण प्रयत्न केले कोणताही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास ठेवून अभ्यास केला अजून एक सांगायचे म्हटले तर सोशल मीडिया हा अभ्यासात सर्वात मोठा अडथळा असतो तयारीच्या दरम्यान मी सोशल मीडिया सारख्या गोष्टी पासून अलिप्त राहिलो कदाचित एवढया लवकर यश संपादन करण्यामागे हे एक सुद्दा कारण असावे,शेवटी एकच सांगतो की आपल्या आयुष्याचा वेळ हा अत्यंत महत्वाचा आहे आपला वेळ सत्कारणी लावून समाजात आपण काही योगदान देऊ शकलो तर या पेक्षा अधिक आनंद आपल्याला कशाचाही होणार नाही .
शुभम पारधी ( पोलीस उपनिरीक्षक ) :
No comments