उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग यांचे मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल वैजापुर फॉरेस्ट आफीस येथे संयुक्त बॉर्डर मिटिंग घेवुन समन्स व वारंट मधी...
उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग यांचे मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल
वैजापुर फॉरेस्ट आफीस येथे संयुक्त बॉर्डर मिटिंग घेवुन समन्स व वारंट मधील आरोपीं बाबत तसेच चोर वाटेने गांजा गावठी पिस्तुल यांची अवैध तस्करी करणारे गुन्हेगार यांचे बाबत दोघा मध्ये समन्वय बाबत सविस्तर चर्चा
प्रतिनिधी चोपडा
(संपादक:हेमकांत गायकवाड)
चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १६/०४/२०२४ रोजी आंतर राज्य चेकपोस्ट वैजापुर ते मध्यप्रदेश सिमालगतचे गेरुघाटी चेक पोस्टवर दुपारी १४.०० वा.ते १७.०० वा.चे दरम्यान मा. कुणाल सोनवणे सो उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग यांचे मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल घेण्यात आली सदर वेळी BDDS पथकाचे उपनिरीक्षक अमोल कवडे, क्युआरटी पथक जळगांव डि.आय किरण सपकाळे, दिपक पाटील पो.मु. जळगांव पोलीस स्टेशन कडील पोनी. कावेरी एम कमलाकर, सपोनी नितनवरे, पोना शशिकात पारधी, पोकॉ सुनिल कोळी पोकों दिपक पाटील, चेतन माळी, पोकों संदिप निळे, जगदीश पाटील तसेच होमगार्ड प्रदिप शिरसाठ, प्रविण सोनवणे तसेच मध्यप्रदेश सिमा अतंर्गत वरला पोलीस स्टेशन चे पी.आय माधव सिह ठाकुर, उप निरीक्षक विकास बेनल, उप निरीक्षक रमेश चंद्र चौहान, प्र. आर. गजेद्र यादव, आर. धर्मेद्र वर्मा, राहुल पाटीदार व आत्माराम निगोले यांचे उपस्थितीत संयुक्त मॉक ड्रिल घेण्यात आली असुन मॉक ड्रील संपल्यानंतर वैजापुर फॉरेस्ट आफीस येथे संयुक्त बॉर्डर मिटिंग घेवुन समन्स व वारंट मधील आरोपीं बाबत तसेच चोर वाटेने गांजा गावठी पिस्तुल यांची अवैध तस्करी करणारे गुन्हेगार यांचे बाबत दोघा मध्ये समन्वय बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली


No comments