adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गरताड ता. चोपडा जि. जळगाव येथे अमृत मोहत्सवी (७५) वर्ष अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजन

  गरताड ता. चोपडा जि. जळगाव येथे अमृत मोहत्सवी (७५) वर्ष अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजन फाईल फोटो  अमृत मोहत्सवी भव्य हरिनाम कीर्तन सप्ताह ...

 गरताड ता. चोपडा जि. जळगाव येथे अमृत मोहत्सवी (७५) वर्ष अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजन

फाईल फोटो 

अमृत मोहत्सवी भव्य हरिनाम कीर्तन सप्ताह चैत्र शुद्ध नवमी (राम नवमी) पासून सुरुवात 

चोपडा (प्रतिनिधी) 

(संपादक: हेमकांत गायकवाड)

तालुक्यातील गरताड येथे अमृत मोहत्सवी भव्य हरिनाम कीर्तन सप्ताह चैत्र शुद्ध नवमी (राम नवमी) पासून सुरुवात होत असून या कीर्तन सप्ताहात सकाळी ५ ते ६ काकड़ा भजन, सकाळी ८ ते ९ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व आरती, तसेच रात्री ८ ते १० वा. सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्वान कीर्तन कारांचे कीर्तन, १) दिनांक १७/०४/२०२४ राम नवमी श्री ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी श्री क्षेत्र पैठण (संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज, मिली चैत्र शु।। १० दिनांक १८/०४/२०२४ श्री ह.भ.प. पांडुरंगजी महाराजगिरी (वाविकर), मिती चैत्र शु||११ दिनांक १९/०४/२०२४ श्री.ह.भ.प. महंत आचार्य अमृतदासजी महाराज जोशी (बीड), मिती चैत्र शु ।।१२ दिनांक २०/०४/२०२४ श्री ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक (नेवासा), मिती चैत्र शु || १३ दिनांक २१/०४/२०२४ श्री ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले (पंढरपूर) (श्री. संत माणकोजी महाराजांचे वंशज, मिती चैत्र शु) । १४ दिनांक २२/०४/२०२४ श्री.ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारिंगे (मुंबई). मिती चैत्र शु||१५ दिनांक २३/०४/२०२४ हनुमान जयंती श्री.ह.भ.प. गाथामूर्ती श्रीगुरु चंद्रशेखर महाराज (देगलूरकर), मिती चैत्र व ।।१ दिनांक २४/०४/२०२४ सकाळी ८.३० वाजता श्री.ह.भ.प. संजय नाना महाराज धोंडगे (देवळा नाशिक) यांचे काल्याचे कीर्तन होईल. महाप्रसाद दिनांक २४/०४/२०२४ रोजी (काल्याच्या कीर्तनानंतर) ११ ते २ या वेळेत.


टीप- दिनांक २३/०४/२०२४ रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत भव्य दिव्य दिंडी सोहळा होईल.


या कार्यक्रमासाठी मृदुंगाचार्य श्री. ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली चंमगावकर, श्री.ह.भ.प. पांडुरंग महाराज ठाकरे, श्री.ह.भ.प.सुनिल महाराज लोणवळी, श्री.ह.भ.प.प्रविण महाराज बेटावदकर,


गायनाचार्य श्री.ह.भ.प. अनिलजी महाराज धरणगावकर, श्री.ह.भ.प. विष्णू महाराज मलकापूर, श्री.ह.भ.प. कनैया महाराज फफादेकर, श्री. ह.भ.प. पंढरीनाथ महाराज सिल्लोड, श्री.ह.भ.प. विश्वनाथ महाराज माजरेहोळ, श्री. ह.भ.प. जगन्नाथ महाराज तावसे बु।।. श्री.ह.भ.प. वासुदेव अण्णा कुरवेल, श्री.ह.भ.प.प्रविण महाराज मजरेहोळ, श्री.ह.भ.प. पुंडलिक महाराज मलकापूर, श्री.ह.भ.प. दिलीप महाराज कुंड.

विणावाद्य सेवा श्री.ह.भ.प. देविदास महाराज सनपुले,

चोपदार श्री.ह.भ.प. लिलाधर मगन पाटील (माउली), माचलेकर, श्री. ह.भ.प. नानाभाऊ धनगर अंबाडे

या सप्ताहात पूर्ण ८ दिवस परिसरातील नामोयंत भजनी मंडळाचे सहकार्य लाभणार आहे. जिल्हाभरातील भाविक भक्त या कार्यक्रमात कीर्तन श्रावणासाठी उपस्थित राहणार आहे. गावाच्या परंपरेनुसार या सप्ताहाचे आयोजन सर्व तरुण मांडळे, भजनी मंडळ, व समस्थ ग्रामस्थ मंडळी गरताड आणि श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदिर समिती गरताड ता. चोपड़ा जि. जळगाव. यांनी केले असून यावेळी आठही दिवस भोजन व्यवस्था राहील सकाळी ९ ते ११ सायंकाळी ५ ते ७ या कार्यात गावातील दातृतवाचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमात भाविभाक्तानी श्रवणाचा लाभ घ्यावा ही विनंती.

No comments