धुळे जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत आनंद खेडे येथे इंग्रज काळातील नोंदी ग्राह्य धरून (टोकरे कोळी )ठराव मंजूर करण्यात आला सर्व विषयाची पडत...
धुळे जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत आनंद खेडे येथे इंग्रज काळातील नोंदी ग्राह्य धरून (टोकरे कोळी )ठराव मंजूर करण्यात आला
सर्व विषयाची पडताळणी करून सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला
राजेंद्र सोनवणे (प्रतिनिधी विरवाडे)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मौजे आनंद खेडे समस्त अनुसूचित जमाती रहिवासी पैकी आदिवासी टोकरे कोळी( ढोर कोडी) हे आनंद खेडे या गावात गावाची निर्मिती झाल्यापासून असल्याबाबत शासन अभिलेखात नोंद आहे टोकरे कोळी ही अनुसूचित जमात व त्यांचे पूर्वज गावाची स्थापना झाल्यापासून गावात रहिवास करीत आहेत. त्यांचा व्यवसाय राखणदारी इत्यादी होती. परंतु कालांतराने बदल होऊन बांबूपासून वस्तू बनवणे जंगलातील जीवनावश्यक वस्तू गोळा करणे कंदमुळे गोळा करणे व त्याच्यावर उपजीविका करणे हे आहेत सदर जमाती अशिक्षित असल्याकारणाने इंग्रज राजवटीत आदिवासी टोकरे कोळी या अनुसूचित जमातीच्या त्यांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी गाव जवळील इनामी जमीन देण्यात आल्या त्यांच्या नोंदी मा. तहसीलदार यांच्या अभिलेखात दप्तरी नोंदीत आहेत अनुसूचित जमातीचे टोकरे कोळी( ढोर कोळी) यांच्या चालरीत्या राहणीमान पोशाख साधे व सिम्पल असल्याने आनंद खेडे या गावाच्या लोकसंख्येच्या जवळपास 30 टक्के लोकसंख्या ही आदिवासी टोकरे कोळी( ढोर कोळी) समाजाचे आहेत गावातील अनुसूचित जमातीतील टोकरे कोळी( ढोर कोळी) यांच्या सांगण्यानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाने चालिरीती पोशाख देवी देवतांचे उत्सव विशिष्ट देवीची पूजा अर्चना या केल्या जातात टोकरे कोळी हा समाज खूप मोठ्या प्रमाणात मागासलेला आहे तरी वरील प्रमाणे सर्व विषयाची पडताळणी करून सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे.
वरील ठराव मंजूर करतेवेळी या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी व इतर नागरिकांनी हजेरी लावली व मार्गदर्शन केले.


No comments