मतदान केंद्राध्यक्ष आणि प्रथम व द्वितीय क्रमांक मतदानाधिकारी यांच्यासाठी ईव्हीएम हाताळणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न चोपडा प्रतिनिधी (...
मतदान केंद्राध्यक्ष आणि प्रथम व द्वितीय क्रमांक मतदानाधिकारी यांच्यासाठी ईव्हीएम हाताळणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघातील चोपडा तहसील कार्यालयात निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष तथा निवडणूक अधिकारी क्रमांक एक यांच्यासाठी ईव्हीएम यंत्र जोडणी हाताळणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी यंत्र जोडणी आणि मॉक पोल करण्यात आले. प्रशिक्षणासोबतच कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी,प्रपत्र क्रमांक 17 सी आणि इतर आवश्यक ती सर्व प्रपत्रे भरण्याचा प्रत्यक्ष अनुभव देऊन सराव करून घेण्यात आला.
दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात केंद्राध्यक्ष आणि प्रथम मतदानाधिकारी व व्दितीय मतदान अधिकारी यांनी प्रशिक्षण घेतले. तसेच प्रथम बॅलेट युनिट हाताळणी घेण्यात घेण्यात येवून ३० गुणांची प्रश्न संच देण्यात आले. नंतर ऑनलाईन २७० गुणांची परिक्षेत मिळाले गुण असे एकत्रित प्रमाणपत्र उत्तीर्ण झालेल्या सर्व कर्मचारी यांन देण्यात आले आहे.
प्रशिक्षण यशस्वीतेसाठी मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, मास्टर ट्रेनर नरेंद्र सोनवणे तथा नियुक्त करण्यात आलेले सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




No comments