प्रेम हा शब्द भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला दिले --- मंहत प्रा.ह.भ.प. सुशील महाराज भारतीय तरुण मुला- मुलींनी पाश्चमात्य संस्कृती स्विका...
प्रेम हा शब्द भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला दिले --- मंहत प्रा.ह.भ.प. सुशील महाराज
भारतीय तरुण मुला- मुलींनी पाश्चमात्य संस्कृती स्विकारत प्रेम या शब्दाचा अर्थ वेगळा धरला असून शरीराचे आकर्षक वाढले आहे.म्हणून प्रत्येक तरुण मुलींनी आपल्या आई वडिलांची इज्जत वेशीवर टांगली जाईल असे कोणतेही काम करू नये.
चोपडा (प्रतिनिधी)--
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आजच्या युगात भारतीय संस्कृतीला महत्त्व असून सुद्धा भारतीयच त्या संस्कृतीचा हार्स करत आहे.आणि भारतीयच फेंशन म्हणून पाश्चिमात्य संस्कृती स्विकारत आहे. संपूर्ण जगाला प्रेमाचे महत्त्व भारतीय संस्कृती कडून मिळाले आहे. निस्वार्थी प्रेम कसे करावे हे देवी देवतांकडून संपूर्ण जगाला मिळाले मिराने कान्हा वर केलेले प्रेम, तसेच अनेक संतानी प्रेम कसे करावे हे शिकविले आहे. असे प्रतिपादन ह.भ.प.महंत प्रा. सुशिल महाराज विटनेरकर यांनी चोपडा येथील महात्मा फुले सार्वजनिक उत्सव समितीने व माळी समाजाने आयोजित संगीतमय शिवपुराण कथा महिला मंडळाच्या प्रांगणात आयोजनात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
त्यांनी अनेक उदाहरणे देत ते पुढे म्हणाले की, भारतीय तरुण मुला- मुलींनी पाश्चमात्य संस्कृती स्विकारत प्रेम या शब्दाचा अर्थ वेगळा धरला असून शरीराचे आकर्षक वाढले आहे.म्हणून प्रत्येक तरुण मुलींनी आपल्या आई वडिलांची इज्जत वेशीवर टांगली जाईल असे कोणतेही काम करू नये.प्रत्येक तरुणींनी महिलांनी मर्यादेत राहावे. मर्यादेत राहीलेल्या महिला ह्या केव्हा ही सुखी राहतील आपले आदर्श सीता , सावित्रीबाई फुले अश्या अनेक महान महिला सुद्धा कधीही आपल्या डोक्यावरिल पदर खाली पडू देत नाही जी महिला पदर घेते तिला इंडियन मदर म्हणतात. भारतीय सत्या ( सती)जितक्या झाल्या आहेत त्या मार्यदेत राहिल्या त्यामुळे त्या पूजल्या जातात.आपल्या कडे एक वेळ लागले होते आणि ते म्हणजे सैराट या चित्रपटाचे आपण त्या सैराट चे अनुकरणीय झालो होतो. परंतु ते संस्कृती नसून त्याचे अनुकरणीय म्हणजे विघातक होय.असे अनेक उदाहरणे देत त्यांनी आपली शिवपुराण कथा सांगितली.
यावेळी चोपडा शहरातील हजारोंच्या संख्येने महिला पुरूष मंडळी हजर होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा फुले सावर्जनीक उत्सव मंडळाचे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.


No comments