adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भोकर वाडा पोलीस चौकी ते रामपूराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध मोठे ( भगदाड) खड्डे

भोकर वाडा पोलीस चौकी ते रामपूराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध मोठे ( भगदाड) खड्डे संबंधित बांधकाम विभागाचे लक्ष तरी कुठे❓ चोपडा: प्रतिनिधी (...

भोकर वाडा पोलीस चौकी ते रामपूराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध मोठे ( भगदाड) खड्डे


संबंधित बांधकाम विभागाचे लक्ष तरी कुठे❓

चोपडा: प्रतिनिधी

(संपादक:हेमकांत गायकवाड)

चोपडा शहरातील भोकर वाडा पोलीस चौकी ते रामपूराकडे जाणारा रस्ता हा कायमस्वरूपी वर्दळीच्या रहदारीचा असुन सदर रस्त्याने पादचारी,सायकल, मोटरसायकल,रिक्षा,प्याजो रिक्षा,बैलगाडीने रात्रपाळी लाईट असल्याने त्या भागातील शेतकरी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी  जातात व मोठे अवजड वाहतूक करणारे वाहन या रस्त्याने रात्रबेरात्री व दिवसा देखील वाहतूक सुरू असते  हा रस्ता गावाबाहेर जाण्याचा मुख्य रस्ता असुन रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्याला दुरुस्त न करण्यात आले तर मोठी जीवित हानी होऊ शकते आणि होणाऱ्या जीवितहानीला जबाबदार कोण असणार असा सवाल देखील जनतेला उपस्थित होत आहे?
सदर रस्त्याने नगर परिषदेचे अधिकारी,कर्मचारी हे रामपुरा भागातील रत्नावती नदीच्या काठी असलेल्या गांडुळ प्रकल्पकडे येणे-जाणे वापर सुरू असतो


तर चोपडा शहराचा कचरा मैला घाण टाकण्यासाठी याच रस्त्याने सदरील वाहन चालवणारे व्यक्ती व त्यावर क्लिनर म्हणून काम करणारे व्यक्ती जवळजवळ शेकडो फेऱ्या या रस्त्याने करीत असतात तरी या रस्त्याच्या मधोमध पडलेल्या जीवघेण्या मोठ्या भगदाड खड्ड्याकडे अद्याप तरी कोणाचेही लक्ष नसल्यागत  बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील पाईपलाईन फुटली होती तिचे दुरुस्ती करण्यात आले होते मात्र पुर्णपणे खड्ड्यात माती देखील भरण्यात आली नाही बेजबाबदार पद्धतीने अर्धवट माती टाकण्यात आलेली होती हे देखील परिसरातील जनतेच्या निदर्शनास आले आहे.सदर रस्त्याने रामपुरा आदिवासी भागातील लोक केळी,पपई,व इतर उपजीविका भागवण्याचे काम करून रात्री घराकडे  परततात हा तोच रस्ता आहे ज्यामुळे कुण्याच्याही  जीवितास धोका होऊ शकतो व मोठी दुःखद घटना या खड्ड्यांमुळे होवून जीव जाऊ शकतो.तरी चोपडा नगर परिषद चोपडा यांना जाग केव्हा येईल? असा या भागातील सुज्ञ नागरिकांना या रस्त्याने वावरणाऱ्या शेतमजूर सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न .तरी जनतेचे हित पाहून व जनतेला या होणाऱ्या त्रासापासून कुठलीही विपरीत परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी आपण लोकसेवक या नात्याने त्या रस्त्याचे काम करावं व  त्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून होणारे अनर्थ टाळावे अशी मागणी या भागातील लोकांकडून होत आहे.

No comments