"आदिवासी पावरा संस्कृतीन जीवणो,भीमराज पावरा स्वलिखित पुस्तकाचे प्रकाशन आदिवासी बोलीभाषा संवर्धन व साहित्य परिषदेत पुस्तक प्...
"आदिवासी पावरा संस्कृतीन जीवणो,भीमराज पावरा स्वलिखित पुस्तकाचे प्रकाशन
आदिवासी बोलीभाषा संवर्धन व साहित्य परिषदेत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
बुद्ध विहार संभाजी नगर,शहादा तालुका शहादा येथे दिनांक २४ रोजी अखिल भारतीय आदिवासी पावरा बारेला मंडल संचलित,आदिवासी बोलीभाषा संवर्धन व साहित्य परिषदेत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी परंपरेनुसार धरती मातेचे वंदन करत करण्यात आली.अध्यक्ष नामदेव पटले व जेष्ठ साहित्यिक वाहरू दादा सोनवणे यांच्या हस्ते भिमराज होजा-या पावरा यांचे हस्तलिखित आदिवासी पावरा संस्कृतीन जीवणो या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.त्यावेळी वाहरू दादा मार्गदर्शन करतांना बोलत होते की,आजच्या आधुनिक युगात पावरा साहित्याची निर्मिती करणे खूप गरजेचे आहे.अफाट ज्ञान आपल्या मौखिक साहित्य परंपरेत आहे त्याला शब्दबद्ध करण्याची नितांत गरज आहे.यावेळी पावरा बारेला मंडलाचे अध्यक्ष नामदेव पटले म्हणाले की,सदर पुस्तक प्रेरणादायक असून आदिवासी जीवन असे हळूहळू साहित्यात येत असल्याने नवीन साहित्यात भर पडेल.यावेळी डॉ. डी.एल पावरा सर यांनी पावरा समाजाचा इतिहास कथन केला.डाॅ. विजयसिंग,प्रा.मोहन पावरा , उन्नती मंडळाचे अध्यक्ष मा.सुरेश मोरे,बबन निकुम,चंपालाल निकुम,आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत भीमराज पावरा यांच्या साहित्य लिखाणचे कौतुक केले.सुशीलकुमार पावरा,कवि विठ्ठल भंडारी,कवी कैलास चौहान,लेखक भरतसिंग पटले,राजु डुडवे,रामसिंग सर, लक्ष्मण पावरा,बिरसा फायटर्स चे विभागीय अध्यक्ष मनोज पावरा, ईश्वर सांळुके,वनिता पटले, चुन्नीलाल ब्राम्हने आदि कवि,लेखक,साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन निकुम यांनी केले.सूत्रसंचलन संतोष पावरा यांनी तर आभार डॉ.विजयसिंग पवार यांनी व्यक्त केले.शैक्षणिक आणि सामाजिक स्तरातून त्यांच्या लिखाणाचे कौतुक करण्यात येत आहे.
No comments